Uncategorized
More Christmas Quotes
Christmas Quotes - Click to Copy
Merry Christmas and Happy New Year!
Wishing you joy, peace, and love this Christmas season.
May your days be merry and bright!
Christmas is not a time nor a season, but a state of mind.
The best way to spread Christmas cheer is singing loud for all to hear.
Christmas is not found in the calendar, but in the kindness we carry all year long.
Christmas is not a date we reach, but a feeling we awaken within
In the quiet giving of love, the soul discovers Christmas.
At Christmas, even the simplest moment shimmers with grace
Hope lights its candle at Christmas, and faith hums a sacred song.
Beyond the gifts we place beneath the tree, Christmas places gratitude within the heart.
Love is the holiest ornament that Christmas asks us to wear.
The spirit of Christmas is weighed not in gold, but in grace.
Christmas is born where compassion dares to act
When the world rushes ahead, Christmas whispers, “Be still.”
At Christmas, silence speaks in mercy and hearts learn to listen.
Christmas blooms in small joys and quiet togetherness.
A single act of kindness shines brighter than a thousand lights at Christmas.
When love dwells within, every day carries the breath of Christmas.
Christmas asks not for perfection, only for presence. Merry Christmas!
The warmth of Christmas lingers longer than winter’s cold.
Christmas is love made flesh through thought, word, and deed.
Joy at Christmas is a flame that grows as it is shared
Christmas teaches us that miracles arrive softly, on tiptoe.
Create Your Own Fancy Text
Your text will appear here
संवादाचा आधार need-for-communication
कमी होत चाललेला परस्पर संवाद: एक चिंताजनक वास्तव
need-for-communication
आजच्या वेगवान आणि तंत्रज्ञानाने भरलेल्या युगात मानवी संवाद हा हळूहळू हरवत चालला आहे. पूर्वीच्या काळी लोक एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलत असत, आपल्या भावना व्यक्त करत असत आणि त्यातून त्यांचे मन हलके होत असे. परंतु आजच्या काळात ही परंपरा लोप पावत आहे असे दिसते.
पूर्वीचा काळ आणि सहज उपलब्ध संवाद
जुन्या काळात संवाद हा जीवनाचा अविभाज्य भाग होता. मित्र, शेजारी, आप्त आणि नातेवाईक हे सगळे एकमेकांच्या आयुष्यात सक्रिय सहभागी असत. एखाद्याला काही सांगायचे असेल, मन मोकळे करायचे असेल, तर त्याला कोणतीही औपचारिकता बाळगावी लागत नसे. एकमेकांच्या खाजगी जीवनाबद्दलही बोलणे वर्ज्य नव्हते. घरातील सुना पाणवठ्यावर किंवा इतर ठिकाणी एकमेकींना भेटल्यावर, सासूबद्दल, नणंदेबद्दल, दिराबद्दल बोलून मन हलके करू शकट होत्या. तसेच सासवा सुद्धा आपल्या सुनांबद्दल एकमेकींशी बोलून मन हलके करू शकत होत्या. याला कोणी योग्य म्हणो की अयोग्य, कागाळ्या करणे म्हणो की चुगल्या करणे म्हणो, पण यामुळे भावनांचा निचरा होण्याला मदत होत होती हे नक्की. आजकाल प्रत्येकाला आपले कसे चांगले चालले आहे हे दाखविणे गरजेचे वाटते. त्यामुळे मनातल्या खुपणाऱ्या गोष्टी मनातच राहतात. पूर्वी लोक एकमेकांना वेळ देत असत आणि कोणत्याही क्षणी एकमेकांसाठी उपलब्ध असत. या संवादातून भावनांचा ओलावा टिकून राहत असे आणि प्रत्येकाला आपण एकटे नाही याची जाणीव होत असे. या संवादामुळे एक प्रकारची भावनिक आधाराची जाळी निर्माण झाली होती, जी व्यक्तीला मानसिकदृष्ट्या सक्षम ठेवत असे.
आजचा काळ: वेळेचा अभाव आणि भावनिक एकाकीपणा
आजच्या काळात मात्र ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आधुनिक जीवनशैलीत कोणाकडेही दुसऱ्यासाठी वेळ नाही. प्रत्येकजण आपल्या कामात, स्वतःच्या जगात इतका व्यस्त आहे की, जवळच्या व्यक्तीशीही संवाद साधायला त्याला फुरसत मिळत नाही. याचा परिणाम असा होतो की, लोक आपल्या मनातील भावना – मग त्या चिंता असोत, सुख-दु:ख असोत, आनंद असो किंवा राग – कोणाशीच व्यक्त करू शकत नाहीत. या भावनांचा निचरा न झाल्याने त्या मनातच साठत जातात आणि हळूहळू मानसिक तणाव वाढत जातो. आजकाल मानसिक रोग आणि मनोकायिक व्याधींचे प्रमाण वाढत चालले आहे, याचे एक प्रमुख कारण म्हणजे हा हरवत चाललेला संवादच आहे. लोक एकमेकांपासून इतके दूर गेले आहेत की, आपल्या जवळच्या व्यक्तीला काय वाटते हे समजून घेण्याची इच्छाही त्यांच्यात उरलेली नाही. या भावनिक एकाकीपणामुळे अनेकांना नैराश्य, चिंता आणि तणाव यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
संवादाची कला शिकण्याची गरज
या समस्येवर मात करण्यासाठी लोकांना पुन्हा एकमेकांशी संवाद साधण्याची कला शिकणे आवश्यक आहे. संवाद ही फक्त बोलण्यापुरती मर्यादित कला नाही, तर ती एकमेकांना समजून घेण्याची, भावना शेअर करण्याची आणि परस्परांना आधार देण्याची प्रक्रिया आहे. आजच्या पिढीला ही कला अवगत नाही, कारण त्यांचा जास्तीत जास्त वेळ तंत्रज्ञानात आणि स्वतःपुरता मर्यादित असतो. संवाद साधणे हे केवळ शब्दांचे आदान-प्रदान नाही, तर त्यात भावनांचा समावेश असतो. ही कला शिकण्यासाठी लोकांना एकमेकांसोबत वेळ घालवणे, मन मोकळे करणे आणि परस्परांबद्दल सहानुभूती दाखवणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालये आणि कार्यस्थळांवरही संवादाचे महत्त्व शिकवले जावे, जेणेकरून नवीन पिढी या मूलभूत मानवी गरजेकडे दुर्लक्ष करणार नाही.
आधुनिक उपकरणांचा प्रभाव
आधुनिक उपकरणे जसे की मोबाईल फोन, टीव्ही आणि इंटरनेट यांनी ही समस्या आणखीनच गंभीर बनवली आहे. आजकाल लोक एकमेकांशी बोलण्याऐवजी आपला जास्तीत जास्त वेळ स्क्रीनवर घालवतात. सोशल मीडियावरून मित्रांशी संपर्कात राहणे सोपे झाले असले, तरी या आभासी संवादात ती खरी भावनिक जवळीक आणि ओलावा नसतो. मोबाईलवर चॅटिंग करताना आपण खऱ्या अर्थाने मन मोकळे करू शकत नाही, कारण समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया, त्याच्या चेहऱ्यावरील भाव आणि त्याच्या आवाजातील भावना आपल्याला दिसत नाहीत. टीव्ही आणि इतर मनोरंजनाच्या साधनांनीही लोकांना एकमेकांपासून दूर नेले आहे. घरात सगळे एकत्र बसलेले असले तरी प्रत्येकजण आपापल्या मोबाईल किंवा टीव्हीमध्ये गुंतलेला असतो. यामुळे कुटुंबातील संवादही कमी झाला आहे आणि एकटेपणाची भावना वाढत चालली आहे.
ऐकून घेणे: संवादाचा महत्त्वाचा भाग
संवादाची कला ही फक्त बोलण्यापुरती मर्यादित नाही, तर त्यात ऐकून घेणे हाही तितकाच महत्त्वाचा भाग आहे. आजकाल कोणालाच दुसऱ्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेण्याची सवय उरलेली नाही. प्रत्येकजण फक्त स्वतःचे मत मांडण्यात आणि स्वतःला सिद्ध करण्यात व्यस्त असतो. परंतु खरा संवाद तेव्हाच होतो जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीचे मनापासून ऐकतो, त्याच्या भावना समजून घेतो आणि त्याला प्रतिसाद देतो. ऐकून घेणे ही एक कला आहे, जी शिकणे आणि अंगीकारणे आजच्या काळात अत्यंत गरजेचे आहे. जर लोकांनी एकमेकांना ऐकायला सुरुवात केली, तर अर्धी समस्या आपोआप सुटेल. कारण जेव्हा एखादी व्यक्ती आपले मन मोकळे करते आणि समोरची व्यक्ती ते लक्ष देऊन ऐकते, तेव्हा त्या व्यक्तीला आपण एकटे नाही असे वाटते आणि त्याचा मानसिक ताण कमी होतो.
आजकाल कमी होत चाललेला परस्पर संवाद ही एक गंभीर समस्या आहे, ज्याकडे आपण गांभीर्याने पाहिले पाहिजे. पूर्वीच्या काळात सहज उपलब्ध असणारा संवाद आज दुर्मिळ झाला आहे आणि त्यामुळे लोक भावनिकदृष्ट्या एकटे पडत आहेत. आधुनिक उपकरणांनी ही समस्या आणखीनच वाढवली आहे, परंतु त्यावर मात करणे अशक्य नाही. संवादाची कला शिकणे, एकमेकांना वेळ देणे आणि ऐकून घेण्याची सवय लावणे या गोष्टींमुळे आपण पुन्हा एकमेकांशी जोडले जाऊ शकतो. समाज म्हणून आपण जर या दिशेने पावले उचलली, तर मानसिक रोगांचे प्रमाण कमी होईल आणि जीवनात पुन्हा एकदा भावनिक जवळीक निर्माण होईल. संवाद हा मानवाच्या अस्तित्वाचा पाया आहे आणि तो जपणे ही आपली जबाबदारी आहे.
माधव भोपे
Makar Sanranti-2025
यावर्षीच्या संक्रांतीसंबंधात माहिती-
यावर्षी सूर्य मंगळवार दि. १४ जानेवारीला सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करीत आहे. म्हणून संक्रांतीचा पुण्यकाल हा सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांपासून ते दुपारी १६.५५ पर्यन्त आहे.मकर संक्रांत दरवर्षी १४ जानेवारीलाच का येते?हिंदू आणि इतर भारतीय धर्मांमधील सण हे हिंदू कॅलेंडर किंवा पंचांगानुसार साजरे केले जातात. आणि पंचांगातील तिथी या चंद्राच्या भ्रमणानुसार शुक्ल प्रतिपदेपासून पौर्णिमा अन पुन्हा कृष्ण प्रतिपदेपासून अमावस्या अशा मोजल्या जातात. आणि आपले मुख्य सण- जसे की पोळा-( श्रावण अमावस्या), रक्षाबंधन (श्रावण पौर्णिमा), गणेश चतुर्थी- (भाद्रपद शुक्ल चतुर्थी), देवी घटस्थापना ( आश्विन शुक्ल प्रतिपदा), दसरा (आश्विन शुक्ल दशमी), दिवाळी (आश्विन महिन्याची अमावस्या) इत्यादि सर्व सण हे चांद्र कालगणनेनुसार किंवा चांद्र महिन्यानुसार (Lunar calendar) ठरतात, जेंव्हा की आपण रोजच्या व्यवहारात वापरीत असलेले जानेवारी फेब्रुवारी हे कॅलेंडर ज्याला की ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणतात, ते सूर्यावर आधारित आहे (Solar calendar). ग्रेगोरियन कॅलेंडर हे इ. स. १५८२ मध्ये पोप ग्रेगोरी 11 यांनी जूलियन कॅलेंडर च्या ऐवजी सुरू केले जे सौर कॅलेंडर आहे. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. तुम्ही हिंदू पंचांग काढून पहा. पंचांगात सूर्याचा राशी बदल हा इंग्रजी महिन्याप्रमाणे दर महिन्याच्या साधारण 14 किंवा 15 तारखेच्या आसपास होतो असे दिसून येईल. म्हणजे सूर्य एका राशीत साधारण 30 दिवस राहतो. अर्थात, सूर्याच्या प्रवेशाचा किंवा बाहेर पडण्याचा अर्थ असा नाही की सूर्य फिरत आहे, तो पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे, याला परिभ्रमण म्हणतात आणि पृथ्वीला सूर्याची एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी एका वर्षाचा वेळ लागतो.मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा धनु राशीपासून मकर राशीत संक्रमण करण्याचा दिवस. तसे सूर्याचे संक्रमण दर महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत होतच असते- म्हणजे तसे पाहिले तर दर महिन्यातच संक्रांत असते!. पण जेंव्हा सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, ते झाले- मकर संक्रमण. हे संक्रमण अनेक कारणांमुळे महत्त्वाचे मानले गेले, आणि त्यामुळे हे मकर संक्रांती म्हणून साजरे केले जाऊ लागले. मकर म्हणजे कॉन्स्टेलशन ऑफ कॅप्रिकॉर्न (constellation of Capricorn). खगोलशास्त्रातील मकर राशी आणि भारतीय ज्योतिषशास्त्रातील मकर राशीमध्ये थोडा फरक आहे. संक्रांती म्हणजे संक्रमण, या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे, हिंदू धर्मातील सुरुवातील उल्लेख केलेले इतर सण चंद्र कॅलेंडर वर आधारित असल्यामुळे, सूर्यावर आधारित असलेल्या ग्रेगोरियन कॅलेंडर मध्ये त्यांच्या तारखा बदलत राहतात, पण मकर संक्रांत ही सूर्याच्या स्थितीवर अवलंबून असल्याने, ती ग्रेगोरियन कॅलेंडरच्या ठराविक तारखेला येते. पण ग्रेगोरियन कॅलेंडर मध्येही ती लीप वर्षाला 15 तारखेला येते.पण काही शे वर्षांपूर्वी ती 14 तारखेलाच येत होती का? तर नाही.सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा तो मकर राशीत प्रवेश करेपर्यंत तीनशे पासष्ट दिवस सहा तास नऊ मिनिटे व दहा सेंकद एवढा कालावधी लागतो. ग्रेगरियन कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे शतकपूर्तीच्या अंकास चारशेनी भाग जात नसेल तर त्या वर्षी लीप वर्ष धरले जात नाही. त्यामुळे दर चारशे वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस तीन दिवसांनी पुढे जातो. तसेच दर वर्षीचा नऊ मिनिटे दहा सेकंद हा काळ साठत साठत जाऊन दर 157 वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस आणखी एक दिवसाने पुढे जातो.उत्तरायण म्हणजे काय? ४०० वर्षांपूर्वी संक्रांत ९ जानेवारीला येत होती! भौगोलिक संदर्भदरवर्षी २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये संक्रमण (प्रवेश) करीत असे, त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले. पुढच्या काळात सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात २१-२२ डिसेंबरलाच होत राहिली, तरी पृथ्वीच्या परांचन गतीमुळे (स्वतःच्या आसाभोवती तिरक्या अंशाने फिरणे) (Axial precession) सूर्याच्या मकरसंक्रमणाची तारीख पुढेपुढे जात राहिली. साहजिकच हिंदूंच्या मकरसंक्रांत या सणाची तारीख बदलत राहिली.मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वीवरून पाहिले असता, २१-२२ डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.मकरसंक्रांतीच्या बदलत गेलेल्या तारखाइंग्लिश महिन्यानुसार हा दिवस बहुधा १४ जानेवारी रोजी येतो. परंतु दर काही वर्षांनी ही इंग्रजी तारीख एकएक दिवस पुढे जाते. उदा०- इसवी सन १६०० : ९ जानेवारी (पौष कृष्ण अष्टमी शके १५२१)
- इसवी सन १७०० : १० जानेवारी (प़ौष कृष्ण षष्ठी शके १६२१)
- इसवी सन १८०० : ११ जानेवारी (पौष पौर्णिमा शके १७२१)
- इसवी सन १८५० : १२ जानेवारी (पौष कृष्ण चतुर्दशी शके १७७१)
- सन १९०० ते २१०० या वर्षांतील मकरसंक्रांतीच्या तारखा अश्या होत्या किंवा असणार आहेत :-
- १३ जानेवारी : सन १९००,१९०२, १९०५, १९०९, १९१३, १९१७, १९२१, १९२५ आणि १९२९.
- १५ जानेवारी : सन १९७२, १९७६, १९८०, १९८४, १९८८, १९९२, १९९६, २०००, २००४, २००८, २०११-१२, २०१५-१६, २०१९-२०, २०२३-२४, २०२७-२८, २०३१-३२, २०३५-३६, २०३९-४०, २०४३-४४, २०४७-४८, २०५०-५१-५२, २०५४-५५-५६, २०५८-५९-६०, २०६२-६३-६४, २०६६-६७-६८, २०७०-७१-७२, २०७४-७५-७६, २०७८-७९-८०, २०८२-८३-८४ आणि २०८६ ते २१००.
- १४ जानेवारी : सन १९०० ते सन २१०० या २०१ वर्षांच्या कालावधीतील ज्यांचा उल्लेख वर आला नाही अशी सर्व वर्षे.
- १६ जानेवारी २१५० (पौष कृष्ण तृतीया शके २०७१)
- १७ जानेवारी २२०० (पौष शुक्ल प्रतिपदा शके २१२१)
- १८ जानेवारी २२५० (पौष शुक्ल चतुर्दशी शके २१७१)
- १९ जानेवारी २३०० (पौष कृष्ण त्रयोदशी शके २२२१)
- २० जानेवारी २४०० (पौष कृष्ण नवमी शके २३२१)
- २१ जानेवारी २५०० (पौष कृष्ण पंचमी शके २४२१)
- २२ जानेवारी २५५० (पौष शुक्ल तृतीया शके २४७१)
- २३ जानेवारी २६०० (पौष कृष्ण द्वितीया शके २५२१)
- किंक्रांत
मनाच्या तळाशी.. To the bottom of Mind
Random thoughts…
These are some random thoughts.. not necessarily arranged in an orderly manner-i.e. a purpose- a beginning..the content.. and a summary…
Some of these thoughts are based on some books I read, some speeches I heard, and some of them just ‘occurred’ to me… It’s a mixed bag…
May be, in future, these musings will take a more orderly shape… till that time.. read on….
कधी कधी आपल्याला एखादे उच्च ध्येय गाठायचे असते.. पण त्यासाठी लागणारा दृढ निश्चय, स्पष्टता आणि निर्भयता नसते.. आपल्याकडे हे गुण नसल्यामुळे, जीवनात वारंवार अपयशाचा सामना करावा लागतो.
आपल्या मनात असंख्य प्रकारच्या भीती आणि काळज्या असतात. “असे झाले तर?..” “तसे झाले तर?..” आणि पूर्ण आयुष्यभर आपण या अनामिक भीतींच्या ओझ्याखाली दबून सगळी कामें एखाद्या गुलामासारखी करीत राहतो. कुठल्याच कामाचा मनापासून आनंद घेऊ शकत नाही.
त्या भीती तशाच राहतात, कारण आपण कधीच त्या खऱ्या आहेत का, त्यांची किती शक्यता आहे, इत्यादि गोष्टींची छाननी करीत नाहीत. आपण त्यांना भिडतच नाही. आणि आपण या गोष्टी कधीच.. कधीच.. कुणा बरोबरही शेअर करत नाहीत.. अगदी आपल्या ‘जवळच्या’ माणसांसोबत, जवळच्या नात्यात.. अगदी आपले आई वडील, भाऊ बहीण.. शिक्षक, जवळचा मित्र.. कुणाही बरोबर शेअर करत नाहीत. अर्थात त्या शेअर न करण्यामागे तसेच काही कारण असू शकते, किंवा आपला त्या व्यक्तिबद्दलचा अविश्वास.. आपली खिल्ली उडवली जाण्याची, आपण मूर्ख ठरवले जाण्याची भीती, आपली कमजोर स्थानें उघडी पडण्याची भीती… आपल्या बद्दल गैरसमज होण्याची भीती..
ही कारणें ही तितकीच काल्पनिक असू शकतात, जितकी की आपली भीती.. आपला अहंकार आपल्याला या गोष्टींची चर्चा करू देत नाही, आणि त्या एखाद्या बाहेरून झाकलेल्या जखमेसाख्या, आतल्या आत चिघळत जातात..
अशा प्रकारच्या भीती सर्वांनाच असतात.. पण केंव्हा ना केंव्हा यांचे परीक्षण केले गेलेच पाहिजे.. त्यांचा सामना केला गेलाच पाहिजे. तरच आपण मरेपर्यंत निर्भय होऊन जगू शकू. निर्भय होऊन जगणे हेच खरे जगणे आहे. हे शक्य आहे का? तर शक्य आहे. हे तेंव्हा शक्य आहे, जेंव्हा आपण ‘बाह्य’ जगतात वागण्याचे ‘नियम’ किंवा ‘पद्धत’ समजून घेऊ आणि आपल्या ‘आत’ काय चालले आहे ते समजून घेऊ शकू.
एक गोष्ट समजून घेण्याची आहे, की एखादी घटना ‘बाह्य’ जगात घडण्याआधी आपल्या ‘आतल्या’ जगात फार पूर्वी घडलेली असते..
आपल्या मनाला क्षणाक्षणाला बदलणाऱ्या बाह्य जगतासोबत चिकटून राहण्याची एवढी सवय झालेली असते, की आपल्या आत.. अगदी आत असलेले स्वतःचे ‘निखळ अस्तित्व’.. त्याला जाणवतच नाही.. आपले ‘निखळ अस्तित्व’, जे की सगळ्या दुःख, चिंता, काळज्या यांच्या पलिकडे आहे.. कालातीत आहे.. शुद्ध आनंद स्वरूप आहे.. पण ते जाणवण्यासाठी आधी मनाचा गढूळपणा कमी होणे गरजेचे असते..
मनाचा गढूळपणा कमी होण्यासाठी मात्र नित्य सराव, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन यांची गरज आहे..
हा विषय निघाला, की “काय करावे, आम्हाला योग्य मार्गदर्शनच नाही मिळत. आजकालच्या जगात ‘खरे गुरु’ मिळणेच अवघड झाले आहे..” इत्यादि गोष्टी लगेच ऐकायला मिळतात. पण वरील तीन गोष्टींपैकी पहिल्या दोन आधी व्हाव्या लागतात हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
माधव भोपे





