https://Goodlifehub.inA website by Madhav Bhope

अनंत चतुर्दशी- भगवान विष्णूंचे व्रत

anant chaturdashi

Anant Chaturdashi अनंत चतुर्दशी हे मुख्य करून भगवान विष्णूचे व्रत आहे.

आज अनंत चतुर्दशी. सर्वसाधारणपणे आपल्याला अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती विसर्जनाचा दिवस हेच जास्त माहिती आहे. पण सार्वजनिक रित्या गणपती बसवण्याची पद्धत ही लोकमान्य टिळक यांच्या काळात म्हणजे अलीकडेच सुरू झालेली. गणपती चतुर्थीला बसवतात, आणि १० दिवसांच्या वास्तव्यानंतर चतुर्दशीला विसर्जन करतात अशी प्रथा सुरू झाली. पण काही जणांचे गणपती दीड दिवसांचेही असतात, तर काहींचे ५ दिवसांचे, काहींचे ७ दिवसांचे इत्यादि. पण अनंत चतुर्दशी चे महत्त्व पुरातन काळापासून वेगळ्याच गोष्टीसाठी आहे. ते म्हणजे अनंताचे व्रत.

हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला अतिशय महत्व आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते. पूजेनंतर अनंत धागा बांधण्याची परंपरा आहे. या धाग्यात 14 गाठी मारल्या जातात. हा धागा रेशीम किंवा कापसाचा बनवला जातो. स्त्रिया डाव्या हातात आणि पुरुष उजव्या हातात हा अनंत धागा बांधतात. अनंत धागा बांधल्याने सर्व दु:ख आणि संकटे दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे. anant chaturdashi

अनंत चतुर्दशीचे महत्त्व 

अनंत चतुर्दशी साजरी करण्याचा उल्लेख महाभारतात आढळतो. पुराणानुसार पांडवांनी जुगारात आपले संपूर्ण राज्य गमावले होते. त्यानंतर त्यांना 12 वर्षांचा वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासात घालवावे लागले. या काळात पांडवांनी आपले वचन पूर्ण करण्यासाठी जंगलात वास्तव्य केले होते. त्यावेळी युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांला आपले राज्य परत मिळवण्याचा आणि दुःख दूर करण्याचा मार्ग विचारला. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की जुगारामुळे माता लक्ष्मी तुझ्यावर नाराज आहे. तुम्हाला तुमचे राज्य परत मिळवायचे असेल तर तुम्ही अनंत चतुर्दशीचे व्रत ठेवा आणि भगवान विष्णूची पूजा करा. हे व्रत केल्याने तुम्हाला सर्व काही परत मिळेल. यानंतर श्रीकृष्णाने युधिष्ठिराला व्रताचे महत्त्व सांगणारी कथाही सांगितली. यानंतर युधिष्ठिराने अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि पांडवांना त्यांचे राज्य परत मिळाले.

अनंत चतुर्दशीची कथा

 प्राचीन काळी एक तपस्वी ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव सुमंत आणि पत्नीचे नाव दिक्षा होते. त्या दोघांना सुशीला नावाची पुण्यवान मुलगी होती. सुशीला लहान असतानाच तिची आई दीक्षा मरण पावली. काही काळानंतर सुशीलाचे वडील सुमंत यांनी कर्कशा नावाच्या महिलेशी लग्न केले. काही दिवसांनंतर सुशीलाचा विवाह ब्राह्मण कौंडिण्य ऋषीशीही झाला. सुशीलाच्या निरोपाच्या वेळी तिची सावत्र आई कर्कशा हिने काही विटा आणि दगड बांधून जावई कौंडिण्याला दिले. कौंडिण्याला कर्कशाचे हे वागणे खूप वाईट वाटले. दुःखाने तो आपल्या पत्नीसह निघून गेला. वाटेत रात्र झाली म्हणून तो एका नदीकाठी थांबला आणि संध्याकाळी भगवंताचे नामस्मरण करू लागला.  त्याचवेळी सुशीलाला अनेक स्त्रिया कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा करताना दिसल्या. सुशीलाने त्या स्त्रियांना पूजेबद्दल विचारले तेव्हा त्यांनी तिला भगवान अनंतांची पूजा आणि त्याचे महत्त्व सांगितले. सुशीलानेही त्याच वेळी व्रत केले आणि 14 गाठींचा धागा बांधून कौंडिण्याकडे आली. कौंडिण्याने सुशीलाला त्या धाग्याबद्दल विचारले तेव्हा सुशीलाने त्याला सर्व प्रकार सांगितला. कौंडिण्याने हे सर्व स्वीकारण्यास नकार दिला आणि तिच्या हातावर बांधलेला अनंत धागा काढून आगीत टाकला. यानंतर त्याची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि तो दुःखी राहू लागला. खूप दिवस उलटल्यानंतर कौंडिण्याने सुशीलाला या गरिबीचे कारण विचारले तेव्हा तिने भगवान अनंतांचा धागा जाळल्याची आठवण करून दिली. हे ऐकून कौंडिण्य अनंत सूत्र घेण्यासाठी वनाकडे निघाला. अनेक दिवस जंगलात शोधाशोध करूनही जेव्हा त्याला अनंत सूत्र सापडले नाही तेव्हा तो निराशेने जमिनीवर कोसळला. त्यानंतर तेथे भगवान विष्णू प्रकट झाले आणि कौंडिण्याला उद्देशून म्हणाले. हे कौंडिण्या तू माझा तिरस्कार केला होता म्हणूनच तुला खूप त्रास सहन करावा लागला. आता तुला पश्चात्ताप झाला आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आता घरी जाऊन अनंत चतुर्दशीचे व्रत कर. 14 वर्षे उपवास केल्यावर तुझे दुःख दूर होईल आणि तू धनवान होशील. त्यानंतर कौंडिण्याने  अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि त्याची सर्व संकटातून सुटका झाली.

या दिवशी अनंत आणि अनंती म्हणजेच चौदा गाठींचा धागा बांधला जातो, जो भगवान विष्णूच्या १४ जगांचे प्रतीक मानला जातो. अनंत चतुर्दशीच्या पूजेच्या दिवशी भगवान विष्णूच्या सहस्त्रनामाचा पाठ करणे अत्यंत शुभ मानले जाते. अनंतच्या १४ गाठी १४ जगांचे प्रतीक मानले जातात. चौदा भुवने – सप्त स्वर्ग आणि सप्त पाताळ मिळून चौदा भुवने होतात.

 सात स्वर्ग लोक

भूलोक, भुवर लोक, स्वर्लोक, महालोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक

सात पाताळ लोक

अतल, वितल, सुतल, महातल, रसातल, तलातल, पाताळ

आपल्या सणावारांचा प्रारंभ प्रतिवर्षी नागपंचमीपासून होतो आणि त्यातील एक पर्व अनंत चतुर्दशीला संपते. अनंत हे विष्णू चे नाव आहे. अनंत हे एका महानागाचेही  नाव आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णूची ‘अनंत’ ह्या नावाने पूजा केली जाते. दर्भपासून अनंतरूपी नाग बनवला जातो. आणि त्याची पूजा केली जाते.

१४ प्रकारची फुले, १४ प्रकारची फळे, १४ प्रकारची धान्ये आणि १४ प्रकारचे नैवेद्य

ह्या व्रतामध्ये पूजा झाल्यानंतर विसर्जन मागाहून दुस-या दिवशी किंवा गणपती पूजेप्रमाणे दोन, पाच दिवसांनी अशाप्रकारे न करता त्याच दिवशी पूजेनंतर काही वेळाने करतात.

हे अनंताचे व्रत १४ वर्षे आचरावे असे सांगितलेले असले तरी अनेक लोक ते नेहमीसाठी पाळतात.

अनंत चतुर्दशीचे महत्त्व अधिक वाढविणारा योग म्हणजे गणेशोत्सवातील मूर्तीचे विसर्जन सगळीकडे थाटामाटात केले जाईल. जलाशयात मूर्ती विसर्जित करावयाच्या असा धर्मनियम असल्यामुळे समुद्र, नद्या, विहिरी अशा ठिकाणी गणेशभक्त वाजतगाजत जाऊन मूर्तीचे विसर्जन करतात. सगळीकडे आनंदाचा जल्लोष चालू असतो आणि अशा जल्लोषामुळे अनंत चतुर्दशी हा अनंताच्या व्रताचा दिवस आहे, ही गोष्ट फारशी कोणाच्या ध्यानातच येत नाही. असो. त्यानिमित्ताने या अनंताच्या व्रताची माहिती सर्वांना व्हावी म्हणून हा प्रपंच. गणेश विसर्जनाच्या सर्वांना शुभेच्छा! (खरं तर गणेश विसर्जनाच्या शुभेच्छा हा शब्दप्रयोग किंवा वाक्यप्रयोग कितपत योग्य आहे हे माहिती नाही.) गणपतीबाप्पा मोरया पुढच्या वर्षा लवकर या….!

संकलक- माधव भोपे 

 

 

 

Memories of Ganesh Utsav-1

आठवणीतील गणेश उत्सव

महाराष्ट्रातील गणेश उत्सवाचे पूर्वीचे स्वरूप 

Memories of Ganesh Utsav in Maharashtra

आज गणेश चतुर्थी. आज गणरायाचे आगमन होत आहे आणि 10 दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. आजकाल सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत चालले आहे. अशा वेळी, आम्ही लहान असतांना गणेश उत्सवाचे स्वरूप कसे होते, हे जसे आठवेल तसे वर्णन करण्याचा प्रयत्न या लेखमालेत केला आहे. तसे एकूण लिखाण 1500 ते 1600 शब्दांचेच आहे, खूप मोठे नाही, पण एवढा वेळ वाचायला देणे आजकाल कोणाला शक्य होत नाही. त्यामुळे हा लेख साधारण 500 शब्दांच्या 3 भागांत विभागला आहे.

आठवणीतील गणेश उत्सव- 1 

आजपासून 50-55 वर्षांपूर्वीचा गणेशोत्सव हा खूपच साधा आणि सात्त्विक होता. महाराष्ट्रातील प्रत्येक गावाची, शहराची, आपली आपली एक वेगळी परंपरा असे. त्या त्या भागातील आजूबाजूची गावेही तीच परंपरा पाळत. गणेशोत्सव जवळ आला की हौशी गणेश मंडळे कामाला लागत. काही नवीन गणेश मंडळेही स्थापन होत. पण या सगळ्यात हौशी मंडळीच असत. गणेशोत्सवाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले नव्हते. वर्गणीची, counterfoil असलेली पावती पुस्तके छापून घेतली जात. मोठाली मंडळे अशी अनेक पावती बुकें छापीत, आणि कार्यकर्त्यांचे वेगवेगळे गट वेगवेगळ्या पावती पुस्तकांसह वर्गणी गोळा करण्याच्या कामाला लागत. वर्गणीच्या आकड्याबद्दल प्रेमळ आग्रह असे, पण कुठेही धाक दपटशा किंवा जबरदस्ती नसे. दुकानदार लोकांकडूनही वर्गणी गोळा केली जाई. छोटी छोटी बाल गणेश मंडळेही असत. त्यांच्या छोट्या कार्यकर्त्यांनाही कौतुकाने अल्पशी वर्गणी दिली जात असे. ते त्यातच खूष असत.

गणपती बसवण्यासाठी कोणाची तरी बैठक, किंवा ओसरी ही बऱ्याच वेळा पुरे होई. मोठाली मंडळे स्टेज उभारीत. पण ते स्टेज कधीच रहदारीला अडथळा करणारे नसे. शक्यतो एका बाजूला लावले जाई.

मला हिंगोलीचा गणेशउत्सव आठवतो. तेंव्हा मी सहावी सातवी इयत्तेत होतो. गल्लीतील गणेश मंडळा तर्फे कार्यकर्ता म्हणून इतरांबरोबर मीही वर्गणी गोळा करायला जायचो. लोकांकडून नगदी पैसे वर्गणी म्हणून घेतांना खूप थ्रिल वाटायचे.

हिंगोली बऱ्यापैकी मोठे शहर होते. तिथे बरीच गणेश मंडळे असत. गणेश उत्सवामधील मुख्य कार्यक्रम दोन प्रकारचे असत. एक म्हणजे निरनिराळी गणेश मंडळे गाण्यांच्या स्पर्धा आयोजित करत. त्यात सिने गीत, भावगीत, भक्तीगीत, सर्व प्रकारची गीते चालत असत. संध्याकाळी 8 च्या नंतर या स्पर्धा सुरू होत, त्या रात्री 11 किंवा 12 वाजेपर्यंत चालत. 

या स्पर्धामध्ये मुख्य करून शिशु किंवा तरुण वर्गाचाच सहभाग असे. त्यातील काही काही गाणारे छान गात आणि मग ते खूप प्रसिद्ध होत. ते रोज किंवा दिवसा आड वेगवेगळ्या गणेश उत्सवां च्या स्पर्धांमध्ये भाग घेत आणि हमखास पाहिले किंवा दुसरे बक्षिस मिळवत. ही बक्षिसे शेवटच्या दिवशी जाहीर केली जात. तसेच रसिक प्रेक्षक त्यांना त्यांच्या गाण्यावर खूष होऊन 1 रुपया पासून 10 किंवा वीस रुपयांपर्यंत बक्षिसे ही देत. ही बक्षिसे लगेच स्टेजवर अँकर द्वारे जाहीर केली जात. काही काही मुले अशी प्रोत्साहनपर खूप रक्कम मिळवीत.

 हिंगोली येथील स्टेशन मास्टर चा मुलगा, “ऐ माँ  तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी” हे गाणे खूप छान म्हणायचा. एक अकबर नावाचा मुसलमानाचा साधारण 18-20 वर्षांचा मुलगा होता.(त्या काळी असे स्पष्टपणे म्हणण्यात काही वावगे वाटत नसे. सर्व जण अत्यंत मिळून मिसळून राहत).  तो पांढरी शुभ्र पॅन्ट आणि तसाच पांढरा शर्ट घालून येई. तो जास्त करून देशभक्तिपर गीते म्हणायचा. त्यातील एक गीत, ‘नौ जवानों भारत की तकदीर बना दो- फूलों के इस गुलशन से काँटों को हटा दो” हे गाणे,  अॅक्शन सहित म्हणायचा. त्याला ही खूप प्रोत्साहनपर बक्षिस मिळे.  त्यांचे पाहून माझ्यासारख्यालाही कधी कधी स्पर्धेत भाग घ्यावासा वाटे. मग स्पर्धेत नाव नोंदवून आल्यावर, आपण ही तसेच गात आहोत, सगळे जण टाळ्या वाजवीत आहेत. आपला पाहिला नंबर आला आहे, इत्यादि स्वप्न रंगविण्यात 2-3 दिवस बरे जात. त्याकाळी लोकप्रिय सिनेमांच्या गाण्याची, घडी घातलेली छोटी छोटी 3-4 पानांची पुस्तके, 20-25 पैशांना मिळत. मग ती आणून त्यातून गाणे पाठ केले जाई.

मी त्या स्टेशन मास्तर च्या मुलाचे पाहून “ऐ माँ  तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी” हे गाणे म्हणायचे ठरवले. तो दादीमाँ नावाचा  पिक्चर ही मी पाहिला होता. त्यामुळे मला ते गाणे खूप आवडायचे. मग स्पर्धेच्या दिवशी रात्री, स्टेज वर आपले नाव पुकारले जाई. तिथे एक माइक ठेवलेला असे. खाली बसूनच मांडी घालून बसून गाण्याची पद्धत होती. माईक वर बोलण्याची कधीच सवय नसे. मग गाणे सुरू केल्यानंतर, माईक मधून आपला आवाज पलीकडे जातोय की नाही, हे काहीच समजत नसे. किती जोरात गायचे, वगैरे काहीच माहित नसे. आपला आवाज आपल्यालाच ऐकू येत नसे. गाण्याची चोपडी समोर ठेवलेली असे. मग त्या चोपडीत पाहून पाहून गाणे म्हटले जात असे. समोरून टाळ्या वगैरे काही ऐकू येत नसत. हशा मात्र थोडा ऐकू येत असे.  मग गाणे झाल्यावर गुपचुप येऊन श्रोत्यांमध्ये येऊन बसले जाई. आणि एवढ्या भांडवलावर, पुढचे काही दिवस बक्षिसाची वाट बघण्यात छान जात. अशा प्रकारे मी एकदा भाग घेतला होता, आणि पुढील बरेच वर्ष मी गणेशोत्सवात गायलो होतो, हे हळूच सांगत होतो.

आठवणीतील गणेश उत्सव-2

Memories of Ganesh Utsav in Maharashtra 

असो. तर अशा या गाण्याच्या स्पर्धा होत. दुसरा एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे निरनिराळे देखावे, ज्यांना ‘झाकी’ म्हणत. निरनिराळी मंडळे वेगवेगळ्या झाक्या (देखावे) बनवीत. हे देखावे बनवायला कोणीही व्यावसायिक मंडळी नसत, तर मंडळाचेच उत्साही कार्यकर्ते असत. कधी भारत पाक युद्धाचा देखावा केला जाई, तर कुठे पुराणातील एखाद्या कथेचा देखावा केला जाई. काही सामाजिक उद्बोधनपर देखावे केले जात. यातील बहुतांश देखावे ‘स्थिर’ असत. पण काही काही मंडळे ‘हालते’ देखावे करत. असे देखावे बघायला तूफान गर्दी उसळे. काही काही देखाव्यात, कोणी तरी, गणपतीच्या पाया पडतो आहे आणि गणपती त्याला आशीर्वाद देतो आहे, असा देखावा- आणि त्यात गणपतीचा मेकअप करून एखादा मुलगा उभा असे. तो सारखा सारखा आशीर्वाद देण्यासाठी हात वर करी. मग मधून मधून त्याला विश्रांती देण्यासाठी पडदा पाडीत. तो थोडा वेळ आराम करे, आणि पुन्हा गणपतीच्या भूमिकेत जाई. रात्रीच्या वेळी, आपल्या मंडळातली गणपतीची आरती उरकली, की लोक झुंडी झुंडीने देखावे पाहायला बाहेर पडत. पूर्ण शहरभर अनेक देखावे असत. प्रत्येक ठिकाणी लाइट्स चा झगमगाट असे. पण तो खूप जास्त नसे. सगळे देखावे पाहता पाहता रात्रीचे बारा केंव्हा वाजून जात काही कळात नसे. या देखाव्यांची ही स्पर्धा असे आणि परीक्षक मंडळ शहरातील सर्व देखाव्यांची पाहणी करून त्यातून नंबर काढत. ही बक्षिसे ही शेवटच्या दिवशी दिली जात. एके वर्षी आमच्या गल्लीच्या ‘बाल गणेश मंडळाने’ कुठला तरी युद्धाचा देखावा केला होता, ते आठवते. त्यात गल्लीतीलच एक धष्टपुष्ट मुलगा सैनिकाचा वेष घालून, सैनिक झाला होता, आणि हातात बंदूक घेऊन शत्रूला मारीत होता, असा काहीसा देखावा होता. काही काही मोठी गणेश मंडळे खूप भव्य दिव्य असे देखावे करीत.

असो. रोज सकाळ संध्याकाळ आरती होई. गणपतीच्या मंडपात सिनेमाची अचकट विचकट गाणे लावण्याची प्रथा सुरू झालेली नव्हती. खरे तर साऊंड सिस्टम तेंव्हा कोणाकडे नसायची.

काही काही मातब्बर गणेश मंडळे मोठ्या शहरातील ऑर्केस्ट्रा बोलावीत. त्याच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी उसळे. भरपूर वाद्य वृंदासहित आलेले ते कलाकार, सिनेमाची लोकप्रिय गाणी अगदी हुबेहूब वाजवत.

अशा प्रकारे पाहता पाहता दहा दिवस कसे निघून जात कळत नसे. आणि मग गणेश विसर्जनाचा दिवस येई-

गणेश विसर्जन गावाबाहेरील एका मोठ्या तलावात करीत. गावातील मानाचा गणपती ठरलेला असे. संध्याकाळी लवकरच, म्हणजे 8-9 च्या सुमारास विसर्जनाची मिरवणूक निघे. शहरभरातील गणपती आपापल्या ठिकाणाहून निघून, त्या मिरवणुकीत रांगेने सामील होत. बहुसंख्य गणपती हे हातगाडी किंवा सजवलेली बैलगाडी यावर असत. या गाड्यांमध्ये गल्लीतील सगळ्या घरांतील छोटे छोटे गणपतीही दिलेले असत. बहुतेक मिरवणूकींच्या समोर भजनी मंडळे टाळ आणि मृदुंग घेऊन, भजने गात चाललेली असायची. कुठेही गणपतीच्या समोर अचकट विचकट नाच गाणे नसायचे. खूप सात्त्विक वातावरण असायचे. उजेडासाठी पेट्रोमॅक्स च्या ‘बत्त्या’ असायच्या. गर्दी भरपूर असायची, पण अत्यंत शिस्तीत आणि शांततेत मिरवणूक चालायची. रात्री बाराच्या आसपास पहिला गणपती तलावावर पोंचायचा. त्याची रीतसर पूजा वगैरे होऊन विसर्जन व्हायचे. म एकेक करीत सगळ्या गणपतींचे विसर्जन होत, शेवटच्या गणपतीचे विसर्जन व्हायला सकाळचे 3 ते 4 वाजायचे.  

आठवणीतील गणेश उत्सव-3

Memories of Ganesh Utsav in Maharashtra

हिंगोलीनंतर आमची बदली सिल्लोड येथे झाली होती. सिल्लोड हे हिंगोली पेक्षा छोटे गाव होते. मी तोपर्यन्त थोडा मोठा झालो होतो, आणि आठव्या वर्गात गेलो होतो. मला हिंगोलीच्या गणेश उत्सवाचा अनुभव होता. गल्लीतल्या मुलांपुढे त्यामुळे माझी थोडी ‘वट’ होती. मग मी पुढाकार घेऊन आमच्या गल्लीत एक ‘बाल गणेश मंडळ’ सुरू केले. आम्ही राहत असलेल्या वाड्याच्या शेजारी नीलकंठ नावाच्या वकिलांचा मोठा वाडा होता. त्यावरील ओसरी त्यांनी आम्हाला मंडळाचा गणपती बसवायला दिली. आम्ही तिथे छोटेखानी गणपती बसवला.

सिल्लोड हे औरंगाबाद तालुक्यातील गाव, संगीत मेळयांसाठी खूप प्रसिद्ध होते. सिल्लोडला देखावे वगैरे करायची प्रथा नव्हती. पण मेळे मात्र खूप व्हायचे. कोणी तरी हौशी, संगीताचा जाणकार असलेला माणूस पुढाकार घेऊन मेळा सुरू करी. मग आजूबाजूच्या बऱ्यापैकी आवाज असणाऱ्या आणि बऱ्यापैकी दिसणाऱ्या मुलांना आणि काही प्रमाणात मुलींनासुद्धा, तो आपल्या मेळयात, त्यांच्या आईवडिलांच्या संमतीने  सामील करून घेई. मेळयाला छानदार नांव दिले जाई. तबला पेटी वगैरेची जुळवाजुळव केली जाई. आणि महिना महिना आधी त्या मुलांची गाण्याची प्रॅक्टिस सुरू केली जाई. काही काही मेळे अनेक वर्षांपासून सुरू होते आणि खूप प्रसिद्ध होते. बहुतेक मेळयांना आपला ड्रेस कोड असे. पण सिल्लोड येथील ‘बापू टेलर’ चा मेळा मात्र खूप प्रसिद्ध होता. त्यांनी युनिफॉर्म ठेवला नव्हता, तर ते त्यांच्या कलाकारांना त्या त्या गाण्याला अनुरूप असा वेष करवीत. जसे की भाजीवाली म्हटले तर नऊवारी साडी, डोक्यावर टोपले, इत्यादि. त्यांच्या या वेगळेपणामुळे तो मेळा खूप तूफान चाले. लांबून लांबून त्यांना बोलावणी येत. औरंगाबादला सुद्धा ते जात. तो आमच्या गावचा मेळा म्हणून आम्हाला खूप अभिमान वाटे. सिल्लोड येथील एस टी महामंडळाचा गणपती पण खूप मोठा आणि प्रसिद्ध होता. त्यांची वर्गणीही खूप जमायची. त्यामुळे ते पण मोठे मोठे कार्यक्रम ठेवायचे.

आणखी एक आठवणारी अत्यंत चांगली गोष्ट म्हणजे गणपतीच्या काळात बरीच गणपती मंडळे, चांगल्या चांगल्या वक्त्यांची, विद्वानांची अभ्यासपूर्ण व्याख्याने असलेल्या व्याख्यान मालिका ठेवत. त्याला खूप गर्दी होत असे. मला आठवते मी प्रसिद्ध वक्ते प्रा. वसंत कुंभोजकर यांचे शिवरायांवरील व्याख्यान सिल्लोड येथेच ऐकले होते. त्याकाळी गणपती उत्सवाला दिलेली वर्गणी सार्थकी लागल्यासारखी वाटायची.  

एखादे वर्षी औरंगाबादला जाण्याचा योग येई. औरंगाबादला मेळे आणि देखावे दोन्ही असत. आणि प्रचंड गर्दी असे. पण त्याकाळी खूप मोठ्या मोठ्या एकापेक्षा एक प्रचंड गणपतींची फॅशन निघाली नव्हती. आणि सगळे काही मर्यादा सांभाळून होत असल्याने त्या काळचे गणपती उत्सव म्हणजे एक आनंद पर्वणी होती हे निःसंशय.

नंतर हळू हळू व्हीडीओ कॅसेटचा जमाना सुरू झाला, आणि गणेश मंडळें 16 एमएम चा पडदा आणून त्यावर पिक्चर ची कॅसेट लावण्यात धन्यता मानू लागली.

आणखी काही वर्षांनी गणेश उत्सवाचा ताबा ‘समाजसेवक’ मंडळींनी घेतला. हळू हळू त्यात राजकारणी लोकांचा शिरकाव झाला, हे आपण डोळ्यासमोर पाहतोच आहोत. आजकाल गणेशोत्सव जवळ आलाय हे आता रस्त्यारस्त्यावर आणि कोपऱ्या कोपऱ्यावर उभारल्या जाणारे प्रचंड स्टेजेस आणि सेट अप,  तिथे व्यावसायिक कामगारांकडून चालू असणारी ठोकाठोकी, काही ठिकाणी मंडप उभारण्यासाठी चांगल्या डांबरी रस्त्यांवर केलेले मोठे मोठे खड्डे, डीजे चे प्रचंड मोठे बॉक्स इत्यादि गोष्टी दिसायला लागल्यावर समजते. आजकाल लोकांचा देवावरचा भक्तिभाव खूप वाढला आहे हे पाहून भरून येते!!

असो. यावर्षी श्री गजाननाच्या कृपेने पाऊस खूप छान झाला आहे. धरणेंही सगळी भरली आहेत, आणि आनंदी आनंद आहे. त्यामुळे यावर्षीचा गणेश उत्सव खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करूयात. या वर्षीच्या गणेश उत्सवानिमित्त सर्व गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा!

माधव भोपे 

 

Teachers day 2024 शिक्षक दिवस

Memories of Teachers Day 

Teachers day 2024 शिक्षक दिन 

शिक्षक दिवस की पुरानी यादें 

कौन हैं इस वर्ष  के पुरस्कार विजेता शिक्षक ?

पूरे वर्ष में कई दिन मनाए जाते है। लेकिन स्वतंत्रता दिवस और गणतंत्र दिवस को छोड़कर केवल 5 सितंबर को  शिक्षक दिन ही मुझे पक्का याद रहता है। उसका कारण है शिक्षक  दिवस से जुड़ी हमारी स्कूली जिंदगी की यादें और साथ ही हमारे संस्कारी उम्र में हमें पढ़ाने वाले हमारे गुरुजनों  की यादें।

जिस तरह भारत में शिक्षकों के प्रति कृतज्ञता  व्यक्त करने के लिए शिक्षक दिवस मनाया जाता है, उसी तरह यह पूरी दुनिया में मनाया जाता है, लेकिन 5 सितंबर को नहीं। यूनेस्को 5 अक्टूबर को विश्व शिक्षक दिवस के रूप में मनाता है।

दुनिया के 100 से ज्यादा देशों में अलग-अलग दिनों को शिक्षक दिवस मनाया जाता है। विश्व शिक्षक दिवस 5 अक्टूबर को मनाया जाता है।

 1994 में यूनेस्को ने शिक्षकों के काम को मनाने के लिए 5 अक्टूबर को ‘विश्व शिक्षक दिवस’ के रूप में मनाने की मंजूरी दी।

1962 से, हम भारतमें  प्रसिद्ध शिक्षाविद् और भारत के दूसरे राष्ट्रपति सर्वपल्ली राधाकृष्णन के जन्मदिन पर  शिक्षक दिवस मना रहा है।

सर्वपल्ली राधाकृष्णन का जन्म 5 सितंबर, 1888 को ब्रिटिश काल के मद्रास प्रेसीडेंसी के उत्तरी आरकोट जिले के एक गाँव तिरुतनी में एक तेलुगु ब्राह्मण परिवार (अब तमिलनाडु में तिरुवल्लूर जिला) में हुआ था। अपनी विद्वता के माध्यम से उन्होंने शिक्षा के क्षेत्र में अपनी पहचान बनाई। कुछ पश्चिमी दार्शनिकों द्वारा वेदांत दर्शन को गलत परिप्रेक्ष मे दिखाए जाने पर  व्यथित  होकर, उन्होंने वेदांत दर्शन और अद्वैत दर्शन का गहन अध्ययन करके, पश्चिमी दार्शनिकों को उत्तर देने के लिए 1914 में “द एथिक्स ऑफ वेदांत ” नामक एक थीसिस प्रकाशित की, जिसमे वेदान्त दर्शन के मूल सिद्धांत को सही तरीके से पेश किया गया। वह सनातन हिंदू दर्शन और अद्वैत वेदांत के कट्टर समर्थक थे।

राधाकृष्णन को 1952 में भारत का उपराष्ट्रपति चुना गया और 1962 में वे भारत के दूसरे राष्ट्रपति बने। वह 1967 तक भारत के राष्ट्रपति रहे । राधाकृष्णन को 1954 में भारत रत्न से सम्मानित किया गया था।

जब वे भारत के राष्ट्रपति बने तो जब उनके कुछ छात्र 5 सितंबर को उनका जन्मदिन मनाने उनसे मिलने गए तो उन्होंने सुझाव दिया कि उनका जन्मदिन मनाने की बजाय 5 सितंबर को देश के शिक्षकों के सम्मान में शिक्षक दिवस के रूप में मनाया जाना चाहिए। तब से, 5 सितंबर को भारत में शिक्षक दिवस के रूप में मनाया जाता है।

हमारे स्कूली दिनों मे शिक्षक दिवस की यादेंteachers day

शिक्षक दिवस पर, हम उस समय के अपने शिक्षकों को याद किए बिना नहीं रह सकते। शिक्षक दिन मुझे अपने  शिक्षकों  के जुनून की याद दिलाता है। उस समय शिक्षकों और बच्चों के बीच बहुत गहरे  संबंध हुवा करते थे।teachers day छात्रों को शिक्षकों के प्रति बहुत सम्मान था, और शिक्षकों का भी छात्रों के प्रति अपार स्नेह हुवा करता था। शिक्षक दिवस को विशेष रूप से याद किए जाने का एक कारण यह भी है की उस दिन छात्र शिक्षक की भूमिका निभाते थे।  शिक्षक दिवस पर स्कूल के होनहार छात्र अलग-अलग विषयों के ‘शिक्षक’ बना करते थे । और शिक्षकों की तरह क्लास मे पढ़ाते थे।  उनके सहपाठी बड़े उत्साह के साथ उनकी कक्षा में उपस्थित होते थे । कुछ नटखट छात्र  अपने  इन ‘शिक्षकों  के, कुछ कठिन सवाल पूछ कर मजे भी लिया किया करते थे । शिक्षक भी अपने विद्यार्थियों को क्लास मे पढ़ाते हुवे देखने के लिए कक्षा में आते थे । हेडमास्टर भी कोई छात्र ही बना करता था। एक  कार्यक्रम मे शिक्षकों के सम्मान मे भाषण भी होते थे और उनके कार्य की सराहना करके उनको धन्यवाद दिया जाता था।  

शायद यह प्रथा अभी भी शुरू है।  पाठकों से अपील है की, वह इस बारे मे अपने अपने अनुभव, नीचे कमेंट्स में लिखे। 

भारत मे. सन 1958 से शिक्षकों को उनके कार्य के लिए पुरस्कार से सम्मानित किए जाने की प्रथा चल रही है। 1962 मे जबसे 5 सितंबर को शिक्षक दिन मनाया जाने लगा, तबसे यह पुरस्कार हर साल 5 सितंबर को दिया जाने लगा.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 प्राप्त करने वाले शिक्षकों की सूची

भारत की राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू द्वारा निम्नलिखित 50 शिक्षकों को 5 सितंबर को उत्कृष्ट शिक्षक के रूप में सम्मानित किया जाएगा। और उन्हें नकद रु 50000/ एक प्रमाण पत्र और एक रजत पदक प्रदान किया जाएगा।

  1. अविनाशा शर्मा – हरियाणा
  2. सुनील कुमार – हिमाचल प्रदेश
  3. पंकज कुमार गोया – पंजाब
  4. राजिंदर सिंह – पंजाब
  5. बलजिंदर बराड़ सिंह – राजस्थान
  6. हुकम चौधरी चंद – राजस्थान
  7. कुसुम लता गरिया – उत्तराखंड
  8. चंद्रलेखा दामोदर मेस्त्री – गोवा
  9. चंद्रेशकुमार भोलाशंकर बोरीसागर – गुजरात
  10. विनय शशिकांत पटेल – गुजरात
  11. माधव पटेल प्रसाद – मध्य प्रदेश
  12. सुनीता गोधा – मध्य प्रदेश
  13. के, शारदा – छत्तीसगढ़
  14. नरसिम्हा मूर्ति एचके – कर्नाटक
  15. द्विति चंद्र साहू – ओडिशा
  16. संतोष कुमार कर – ओडिश
  17. आशीष कुमार रॉय – पश्चिम बंगाल
  18. प्रशांत कुमार मारिक – पश्चिम बंगाल
  19. उर्फनामीन जम्मू – कश्मीर
  20. रविकांत द्विवेदी – उत्तर प्रदेश
  21. श्याम मौर्य प्रकाश यू – उत्तर प्रदेश
  22. डॉ. मिनाक्षी कुमारी – बिहार
  23. सुकेंद्र कुमार सुमन – बिहार
  24. के. सुमा – अंडमान एंड निकोबर द्वीप
  25. सुनीता गुप्ता – मध्य प्रदेश
  26. चारू शर्मा – दिल्ली
  27. अशोक सेनगुप्ता – कर्नाटक
  28. एच एन गिरीश – कर्नाटक
  29. नारायणस्वामी.आर – कर्नाटक
  30. ज्योति पंका – अरुणाचल प्रदेश
  31. लेफिजो अपोन – नागालैंड
  32. नंदिता च ओंगथम – मणिपुर
  33. यांकिला लामा – सिक्किम
  34. जोसेफ वनलालह्रुआ सेल – मिजोरम
  35. एवरलास्टी एनजी पाइनग्रोप – मेघालय
  36. डॉ.नानी जी देबनाथ – त्रिपुरा
  37. दीपेन खानिकर – असम
  38. डॉ. आशा रानी – झारखंड
  39. जिनु जॉर्ज – केरल
  40. के सिवाप रसद – केरल
  41. मिडी श्रीनिवास राव – आंध्र प्रदेश
  42. सुरेश कुनाट – आंध्र प्रदेश
  43. प्रभाकर रेड्डी पेसरा – तेलंगाना
  44. थदुरी संपत कुमार – तेलंगाना
  45. पल्लवी शर्मा – दिल्ली
  46. चारु मैनी – हरियाणा
  47. गोपीनाथ आर – तमिलनाडु
  48. मुरलीधरन रमिया सेथुरमन – तमिलनाडु
  49. मंटय्या  चिन्नी बेडके – महाराष्ट्र Z.P.UPEER PRIMZRY DIGITAL SCHOOL JAJAVANDI
  50. सागर चित्तरंज एन बागडेमहाराष्ट्र SOU S. M. LOHIA HIGHSCHOOL AND JUNIOR COLLEGE KOLHAPUR

 

संबंधित शिक्षकों के स्कूल का नाम, पता सहित पूरी सूची और पूरी सूची के लिए यहां क्लिक करें।

Janmashtami in Maharashtra in old days

Janmashtami

Janmashtami in Maharashtra in old days: महाराष्ट्र मे पुराने जमाने मे मनाई जाने वाली जन्माष्टमी/ गोकुलाष्टमी

भारतवर्ष के दो आराध्य देवता भगवान श्रीराम तथा श्रीकृष्ण ये केवल भारत में ही नहीं अपितु भारतके बाहर दुनिया के हर हिस्से में किसी न किसी रूप में पूजे जाते रहे है। आज, श्रावण माह के कृष्ण पक्ष की अष्टमी तिथि को  महायोगेश्वर भगवान श्रीकृष्णका अवतार प्राकट्य दिवस है। इसे जन्माष्टमी, गोकुल अष्टमी या और और नामोंसे जाना जाता है। यह दिवस भारतभर में किसी न किसी रूप में मनाया जाता है। इतनाही नहीं, पिछले कुछ दशकोंसे विदेशोंमे भी यह दिन मनाया जा रहा है। महाराष्ट्र में गोकुलअष्टमी के दूसरे दिन को दही हण्डी के रूप में मनाया जाता है।

आजकल इस उत्सव का रूप काफी बदल गया है। लेकिन प्रस्तुत लेख में, आजसे 50-55 साल पहले, महाराष्ट्र में यह उत्सव किस प्रकार मनाया जाता था, यह मेरे स्वयं के अनुस्मरण के आधार पर लिखा जाता है।

श्रावण (सावन) का महीना यह चातुर्मास (चौमासा) का पहिला महीना होता है। यह चार महीने दरअसल वर्षा ऋतु तथा शरद ऋतु के होते है। इन चार महीनों में बारिश की वजहसे वातावरण में नमी होती है, जिसकी वजहसे पाचन शक्ति कमजोर होती है। वातावरण में नमी की वजहसे तथा कीचड़ आदि की वजहसे सूक्ष्म जीव जंतुओंकी उत्पत्ति बहुतायत में होती है। शायद यही वजह है कि हमारे पूर्वजोंने इन चार महीनों में अनेक प्रकारके व्रतों आदि कि व्यवस्था कर दी जिनमे उपवास एक मुख्य अंग होता था। महाराष्ट में भाविक लोग श्रावण मास के सारे सोमवारको उपवास रखते है। इसी प्रकार गोकुलअष्टमी के दिन भी उपवास रखा जाता है।

आजसे 50-60 वर्ष पहिले, इस प्रकार, श्रावण का महीना शुरू होते ही गावोंमे तथा शहरोंमे एक प्रकारका धार्मिक वातावरण तयार होता था। श्रावण मास में आनेवाला पहिला त्यौहार रक्षा बंधन का होता था। उसके आठ दिन बाद आता था गोकुल अष्टमी का त्यौहार.

अष्टमी के दिन भगवान श्रीकृष्ण के आगमन के उपलक्ष्य में घर के बड़े बूढ़े उपवास रखते थे। कई बार उसमे बच्चे भी शामिल होते थे।

Janmashtami in Maharashtra in old days

उस दिन हर घर में मिट्टी से बनी हुई गोकुल कि प्रतिकृति बनाई जाती थी। इसमे हर किसी की कलात्मकता और सृजनता को खूब अवसर मिलता था। बच्चे सुबहही खेतोंमे जाकर वहाँसे काली मिट्टी लेकर आते थे। घरकी महिलाएं उसे साफ करती थी, फिर उस मिट्टीमे पानी डालकर उसे अच्छी तरह से गूँथ कर फिर उससे गोकुल की विविध आकृतियाँ बनाई जाती थी।  घरमे जो लकडीके तख्ते होते थे उनमेसे एक अच्छासा तख्ता लेकर उसपर पहले मिट्टी से गोकुल की तटबंदी यानि चारों ओर कि सीमा बनाई जाती थी। फिर उसके अंदर विविध प्रकारकी आकृतियाँ बनाई जाती थी। उसमे गोप और गोपियाँ होती थी, गौएँ होती थी, नन्द बाबा और यशोदा मैया होती थी, पूतना की भी मूर्ति बनाई जाती थी! गाँव में कुत्ता और गधा भी दिखाया जाता था। आटा चक्की, ओखली, चूल्हा, बर्तन, रोटियाँ, माखनके बर्तन, यह सब। तुलसी वृंदावन और उसमे एक छोटासा तुलसीका पौधा। नन्द बाबा के घरमे कन्हैया का पालना सजाया जाता और उसमे छोटीसी कन्हैयाकी मूर्ती! फिर उस गोकुल को जोवार के दानोसे तथा फूल और पत्तोंसे सजाया जाता। यह गोकुल बनाने मे घरकी सभी सदस्योंका सहयोग होता था और उसमे एक अलग ही आनंद आता था। बाल कन्हैया के प्रशादी के तौर पर सोंठ और चीनी का प्रशाद बनाया जाता था। कहीं कहीं उसमे धनिया, खसखस, नारियल की गिरी, आदि भी डाले जाते थे। गोंद के लड्डू भी कहीं कहीं बनाए जाते थे।

शाम के बाद, देर रात मे फिर श्रीकृष्ण का जन्म उत्सव मनाया जाता था। श्रीकृष्ण को पालने मे डालकर झुलाया जाता था और पालने गाए जाते थे।

दूसरे दिन दोपहर के पश्चात, गाँव के मुख्य चौराहोंपे दही हांडी का उत्सव होता था। ऊंची जगहोंपर रस्सी बाँधकर उसमे बीचोंबीच सजाया हुवा मटका बांधते थे। उसमे गीले पोहे, फूली हुवी जोवार, कच्चे आम का आचार, नींबू का आचार, ककड़ी, अनार, अमरूद  भीगी हुवी चने की दाल, दही, आदिसे बना हुवा मिश्रण, जिसे ‘गोपाल काला’ कहते है, वह भरा होता था। मनचले नवजवानोंकी टोली, जिन्हे ‘गोविन्दा’ कहा जाता था, वे पिरामिड बनाकर उस हांडी को फोड़ते थे। इसके लिए बड़े बड़े ईनाम भी कहीं कहीं लगाए जाते थे।

गाँव के मंदिरोंमे अष्टमी के शाम को कीर्तनकार कृष्ण जन्म की कथा करते थे, और वहाँ भी कृष्ण जन्म सार्वजनिक रूप से मनाया जाता था। वहाँ तब दही हांडी छोटे रूप मे होती थी।

आजकल पिछले कुछ वर्षोंसे दही हांडी का स्वरूप दिन ब दिन व्यावसायिक होते जा रहा है। मुंबई जैसे महानगरोंमे सेंकड़ों गोविन्दा मण्डल बने हुवे है, जिनमे  तथाकथित ‘समाजसेवकों’ का सहभाग है और आजकल तो राजनीतिक दल भी इसमे बढ़ चढ़ कर हिस्सा लेते है। हर एक गुट का, हर दल का अपना गोविन्दा दल होता है। लाखों, करोड़ों रुपए इसमे खर्च किए जाते है। जोर जोर से डीजे और अन्य वाद्य बजाकर जुलूस निकाले जाते है। लड़कियों के भी गोविन्दा दल होते है। वे भी इसमे बढ़ चढ़ कर हिस्सा लेती है। कई ‘गोविन्दा’ ऊंची ऊंची हाँडियोंको फोड़ते हुवे घायल भी हो जाते है। सरकारने उनका बीमा भी करवाया है!

दही हांडी का उत्सव अब महाराष्ट्र तक सीमित नही रहा है। यह भारतके अन्य शहरोंमे भी धूमधामसे मनाया जा रहा है।

पुराने जमानेकी , सादगी से मनाये जा रहे उत्सवोंकी और परंपराओंकी यादें अब धूमिल होते जा रही है। इस वर्ष गोकुल अष्टमी (जन्माष्टमी) के अवसर पर उन पुरानी सुनहरी यादों को ताजा करने की यह एक कोशिश है।

आप सब को इस जन्माष्टमी की बहुत बहुत शुभकामनाएं।

अगर आपको यह प्रयास अच्छा लगा होगा तो अपना अभिप्राय नीचे कॉमेंट्स मे अवश्य दें।

माधव भोपे