Small Hotels in America अमेरिकेतील छोटी हॉटेल्स
अमेरिकेतील हॉटेल्स चे अनुभव
नायगारा पाहून परत येत असतांना, बफेलो येथून, क्लीव्हलँडला कारने परत येत असतांना, वाटेत कुठे ब्रेकफास्ट मिळेल का म्हणून मोबाईल वर शोध घेत होतो.
अमेरिकन फूड मधील आम्हाला काहीच चालण्यासारखे नसायचे, कारण बहुतेक सर्व पदार्थांमध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरुपात नॉन व्हेज असतेच. भारतीय जेवणाशी त्यातल्या त्यात मॅच होणारे दोन प्रकार म्हणजे दोन प्रकार: एक तर मेक्सिकन आणि दुसरे म्हणजे थाई.
आम्हाला मोबाईलवर वाटेतील एका छोट्याशा व्हिलेज मध्ये एक थाई रेस्टॉरंट असल्याचा शोध लागला. गूगल मॅप च्या सहाय्याने रस्ता शोधत शोधत आम्ही त्या बऱ्याच आतल्या बाजूला असलेल्या छोट्याशा खेडेगावात गेलो. अत्यंत शांत व छोटेसे खेडे होते ते. रस्त्यावर एकही माणूस दिसत नव्हता- नेहमीप्रमाणे. खेडे असल्यामुळे वाहनेही अगदी अभावानेच होती. मॅपवरून पत्ता काढून आम्ही त्या थाई रेस्टॉरंटमध्ये गेलो. बहुतेक त्यांचे रहाते घरच छोट्याश्या रेस्टॉरंटमध्ये परिवर्तित केले होते, व २-३ थाई स्त्रियाच ते रेस्टॉरंट चालवीत होत्या. अत्यंत टुमदार, रेखीव व कलात्मक सजावट असलेली जागा. आतमध्ये कमालीची शांतता आणि स्वच्छता. खेडेगाव म्हणून कसलाही गचाळ पणा चालेल अशी मानसिकता नाही. सर्व गोल टेबल्सवर स्वच्छ टेबल क्लॉथ्स, त्यावर स्वच्छ काचेचे ग्लास. परीट घडीचे पांढरे शुभ्र रुमाल टोकदार घडी घालून त्या ग्लास मध्ये ठेवलेले.
आम्ही तिथे जाऊन बसल्यावर मध्यमवयीन थाई स्त्रीने (जी की बहुतेक तेथील मालकीण असावी), तत्परतेने व हसतमुखाने, आमच्या हातात मेन्यू कार्ड दिले. इथे सगळ्याच हॉटेल्स मध्ये तुम्हाला मेन्यू कार्ड लगेच देतात. त्यासाठी, तुम्हाला ‘शुक, शुक’ म्हणून कोणाचे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करावा लागत नाही, की ओरडावे लागत नाही. तसेच तुम्ही ऑर्डर देईपर्यंत तुमच्या छातीवर उभे रहात नाहीत, की, अर्धवट ऑर्डर घेऊन घाई घाईने पळून जात नाहीत. तुम्हाला मेन्यू कार्ड दिल्यानंतर, ते वाचून तुमचा मेन्यू ठरवायला पुरेसा वेळ देतात व तुमचे ठरले आहे असे दिसताच, तुमची ऑर्डर घ्यायला पुढ्यात येतात. तसेच तुमची जी स्पेशल requirement असेल ती काळजीपूर्वक नोट करतात उदा..Less spicy, no onion, no meat, no eggs, इत्यादि. व त्याबरहुकूम पदार्थ बनवतात.
तर अशा प्रकारे आमची ऑर्डर घेऊन त्या स्त्रिया गेल्या, आणि १५ मिनिटात, अत्यंत स्वादिष्ट व गरम गरम असे जेवण आमच्या पुढ्यात आले. त्या शांत खेड्यात, इतक्या छान वातावरणात खाल्लेले जेवण हे आमच्या चांगलेच लक्षात राहिले.
आम्ही नायगरा हून परत आलो, तेंव्हा, रात्रीचे १० वाजून गेले होते, बराच उशीर झाल्यामुळे, व विमान तळावरून घरी पोहोचायला अजून एक तास लागणार असल्यामुळे, आम्ही, बाहेरच जेवायचे ठरवले. परंतु हॉटेल्सही बंद होण्याची वेळ झाली होती. बहुतेक सर्व हॉटेल्स रात्री १० किंवा जास्तीत जास्त १०.३० पर्यंत बंद होतात. मग सचिन गाडी चालवीत असतांना, मी वेब वर, उशिरापर्यंत उघडी असणारी हॉटेल्स शोधू लागलो. अशी फारच थोडी हॉटेल्स होती. त्यातले, भारतीय जेवण देणारे एक हॉटेल नशिबाने सापडले, जे की ११.३० पर्यंन्त उघडे होते. आम्ही तिथे फोन करून खात्री करून घेतली आणि मॅप वरून शोधत शोधत रात्री ११ च्या सुमारास त्या हॉटेल मध्ये पोहोंचलो. ते हॉटेल बहुतेक कुणीतरी भारतीय बिझनेसमननेच सुरु केले असावे. हॉटेल अजून प्राथमिक अवस्थेतच होते, म्हणजे डेकोरेशन वगैरे विशेष काही नव्हते. पण तिथे बरेच भारतीय ग्रुप्स जेवण करीत असतांना दिसत होते. आम्ही गेल्याबरोबर, वेटर च्या स्वरुपात, ३-४ भारतीय मुलींचा जथा आम्हाला समोर आला, व आम्हाला रिकाम्या असलेल्या टेबल वर बसवले. लगेच त्यातील दोन मुली ऑर्डर घ्यायला आल्या. इथे जे भारतीय शिक्षण घेतात, ते असे पार्ट टाईम जॉबही करतात, असे ऐकले होते. या मुली बहुतेक अशांपैकीच असाव्यात असे वाटले. आम्ही बरेच थकून आलो होतो व खूप सडकून भूक लागली होती. अशा वेळी, आम्हाला जास्त वाट पाहायला न लावता, रात्री ११.३० वाजता, गरमागरम भारतीय जेवण आमच्यासमोर आले. त्या जेवणाचा स्वाद इतका चांगला लागला म्हणून सांगू!
त्याआधी आम्ही ह्यूस्टन ला ‘नासा’ पाहायला गेलो होतो, तेंव्हा, तेथून निघतांना, मेक्सिकन जेवणाचा आस्वाद घेतला, त्याची माहिती, नंतरच्या एपिसोड मध्ये!
——*****—–
माधव भोपे.
वरील लेखमाला ही, आमच्या अडीच महिन्याच्या अमेरिका वारी नंतर, साधारण नोव्हेंबर डिसेंबर २०१६ च्या सुमारास लिहिली होती, आणि फॅमिली whatsapp ग्रुप मध्ये टाकली होती. आता त्यात काही इमेजेसची भर घालून, माझ्या ब्लॉग वर प्रकाशित करीत आहे. अर्थात आता बरेच बदल झाले असतील. भारतातही आता आपल्याकडे खूप प्रगती झाली आहे.
माधव भोपे




त्या त्या भागाचा नकाशा, त्या भागाची माहिती देणारी पॅम्फ्लेट्स इत्यादि ठेवलेले असतात. तेथील छोट्याशा ऑफिसमध्ये माहिती देण्यासाठी एखादी व्यक्ती बसलेली असते व ती तुम्हाला, विचारलेल्या गोष्टीची तत्परतेने व सविस्तर माहिती, हसतमुख चेहऱ्याने देते. प्रत्येक ठिकाणी एक अॅटोमॅटिक व्हेंडिंग मशीन ही ठेवलेली असते, ज्यात तुम्ही ठराविक रकमेची नाणी, नोटा टाकून, किंवा कार्ड स्वाईप करून कोल्ड ड्रिंक, चॉकलेट्स, कुकीज किंवा इतर पॅक्ड खाण्याचे पदार्थ घेऊ शकता. प्रत्येक रेस्ट एरिया मध्ये अत्यंत स्वच्छ, भरपूर पाणी असलेली, कमोड मध्ये पुरेसे टिशू पेपर्स असलेली, पूर्ण एअर कंडिशन्ड, अशी, वॉश रूम उपलब्ध असते (इथे तिला रेस्ट रूम म्हणतात.) लहान मुलांसाठी कमी उंचीची सोय पण उपलब्ध असते. प्रत्येक ठिकाणच्या वॉश बेसिन मध्ये सेन्सर बसवलेले असतात (विमान तळावर असतात तसे), जेणे करून तोटी च्या खाली हात धरल्यावर पाणी येईल.

छात्रों को शिक्षकों के प्रति बहुत सम्मान था, और शिक्षकों का भी छात्रों के प्रति अपार स्नेह हुवा करता था। शिक्षक दिवस को विशेष रूप से याद किए जाने का एक कारण यह भी है की उस दिन छात्र शिक्षक की भूमिका निभाते थे। शिक्षक दिवस पर स्कूल के होनहार छात्र अलग-अलग विषयों के ‘शिक्षक’ बना करते थे । और शिक्षकों की तरह क्लास मे पढ़ाते थे। उनके सहपाठी बड़े उत्साह के साथ उनकी कक्षा में उपस्थित होते थे । कुछ नटखट छात्र अपने इन ‘शिक्षकों के, कुछ कठिन सवाल पूछ कर मजे भी लिया किया करते थे । शिक्षक भी अपने विद्यार्थियों को क्लास मे पढ़ाते हुवे देखने के लिए कक्षा में आते थे । हेडमास्टर भी कोई छात्र ही बना करता था। एक कार्यक्रम मे शिक्षकों के सम्मान मे भाषण भी होते थे और उनके कार्य की सराहना करके उनको धन्यवाद दिया जाता था।