https://Goodlifehub.inA website by Madhav Bhope

भक्तांच्या कथा-4 -महान भक्त- यमराज – Devotee- 4 Yamraj

Please use the google translator at the right top corner of the post to read the post in your language

Devotee- 4 Yamraj

ईश्वर प्राप्तीसाठीचे जे मार्ग आहेत- ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग आणि भक्तियोग, यापैकी सर्वात सुलभ आणि सर्वांना सहज उपलब्ध असणारा मार्ग म्हणून भक्तिमार्ग प्रसिद्ध आहे. भक्तिमध्येही नवविधा म्हणजे नऊ प्रकारची भक्ति सांगितलेली आहे- श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम्, अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्.  

यात सगळयात पहिला भक्तीचा प्रकार म्हणजे श्रवण हा सांगितला आहे. त्यात आपल्या आराध्य दैवताच्या कथा ऐकणे याबरोबरच आजवर होऊन गेलेल्या भक्तांच्या कथा ऐकणे यांचाही समावेश आहे. आपल्या भारतवर्षात आजवर असंख्य भक्त होऊन गेले आहेत. निरनिराळ्या प्रदेशात, निरनिराळ्या काळात, निरनिराळ्या भाषिक भागात, होऊन गेलेल्या भक्तांच्या कथा ऐकणे किंवा वाचणे हा सुद्धा एक सत्संगाचा अतिशय परिणामकारक प्रकार आहे. 

गीताप्रेस गोरखपूर यांच्याकडून अशा भक्तांच्या कथा निरनिराळ्या अंकांत किंवा एखाद्या विशेष अंकात प्रसिद्ध होत असतात. ‘भक्तांच्या कथा’ या मालिकेत आपण अशाच भक्तांच्या चरित्राची ओळख करून घेणार आहोत. भक्तांच्या चरित्र वाचनाने चित्त शुद्ध होण्यास नक्की मदत होते. ज्यांना अध्यात्मात रस आहे अशा वाचकांना ही मालिका नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.

महान भक्त- यमराज

Devotee-4 Yamraj

या आधीच्या लेखात आपण पाहिले की प्रमुख 12 भागवताचार्यांमध्ये यमराज हे स्वतः आहेत. त्यांना यमधर्मराज म्हटले जाते. म्हणजे जे धर्माचे पालन करतात. यमराज हे नित्य देव असून ते सूर्यपुत्र आहेत असे मानले जाते. ते देवशिल्पी विश्वकर्मा यांची पुत्री संज्ञा हिच्यापासून उत्पन्न झाल्याचे मानले जाते. त्यांचे शरीर श्याम रंगाचे आहे आणि हातात यमदण्ड घेतलेला असतो. त्यांचे वाहन रेडा आहे. भगवान ब्रह्माच्या आदेशानुसार त्यांनी प्राण्यांच्या कर्मानुसार फळाचा निर्णय करण्यासारखे कठोर कार्य त्यांनी अंगिकारले आहे.

यमराज हे परम भक्त आहेत. श्रीमद् भागवतात आले आहे की, यमराज आपल्या दूतांना सांगतात-

“ज्यांची वाणी भगवंताच्या मंगलमय गुणांना आणि पवित्र नामाला वर्णन करत नाही, ज्यांचे चित्त भगवंतांच्या चरणकमळाचे चिंतन करत नाही, अशा, भगवान विष्णूच्या पावन कर्मांपासून पृथक राहणाऱ्या दुष्ट लोकांनाच तुम्ही इथे म्हणजे यमपुरीत आणीत जा. जे लोक भगवंताच्या कथा संकीर्तनामध्ये मग्न राहतात त्यांच्याजवळ तुम्ही जाऊ नका. कारण की मी दुसऱ्या प्राण्यांना तर दण्ड देऊ शकतो, पण भगवंताच्या भक्तांना दण्ड देण्याची शक्ति माझ्यात नाही.”

कठोपनिषदा मध्ये यम आणि नचिकेता यांचा संवाद आला आहे. नचिकेता हा वाजश्रव ऋषी किंवा  उद्दालक यांचा मुलगा होता. त्याच्या वडिलांनी एक यज्ञात, ज्याच्यात आपली सर्व संपत्ति दान करायची असते, अशा यज्ञात, त्यांच्याजवळील म्हाताऱ्या आणि भाकड गायी दान करतांना पाहिले. त्याला फार वाईट वाटले. त्याने आपल्या वडिलांना विचारले, “पिताजी, तुम्ही मला कोणाला दान करणार?” दोन तीन वेळेला हाच प्रश्न ऐकून त्याच्या वडिलांनी त्याला रागाने सांगितले, की जा, तुला यमाला दान दिले आहे. नचिकेता आपल्या वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून यमलोकाला जायला निघाला. तिथे यमराज उपस्थित नसल्याने त्याला तीन दिवस त्यांची वाट पाहत थांबावे लागले. यमराज परत आल्यावर, आपल्यामुळे या ब्राह्मणकुमाराला वाट पहावी लागली याचे त्यांना दुःख झाले, आणि त्यांनी त्याचे आदरातिथ्य करून, झालेली विलंबाबद्दल त्याला 3 वर मागून घेण्यास सांगितले.

yam nachiketa

तेंव्हा, नचिकेताने, पहिल्या वराने आपल्या वडिलांसाठी शांतीची मागणी केली, दुसऱ्या वराने, यज्ञाविषयी माहिती विचारली, आणि तिसऱ्या वराने त्याने आत्म्याच्या स्वरूपाबद्दल विचारले. यमराजाने पहिले दोन वर तर दिले, पण तिसऱ्या वराबद्दल यमराजाने आधी नचिकेत्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला आणि त्याला इतर अनेक भौतिक सुखांचे वर देण्याची लालूच दाखविली. अशा प्रकारे यमराज त्याची परिक्षा पाहत होता. पण नचिकेता कुठल्याच प्रलोभनाला भुलला नाही, आणि आत्मज्ञान मिळण्यासाठी आग्रही राहिला. कारण नचिकेत्याला माहित होते की आत्मज्ञान देण्यासाठी यमराजासारखा दुसरा गुरू मिळणे नाही. तेंव्हा मग यमराजाने त्याला जे आत्मज्ञान दिले, ते कठोपनिषदा मध्ये वर्णन केले आहे.  

श्रीहरि!

संकलक- माधव भोपे

आजकाल लहान मुलांना मोबाईल आणि टीव्हीच्या अतिरेकी वापरापासून आणि त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामां पासून कसे वाचवावे हा सगळ्याच पालकांसमोर असणारा यक्षप्रश्न आहे. संस्कारक्षम अशा वयात अशा मुलांना रंजक आणि त्याचबरोबर शुभसंस्कार करणाऱ्या गोष्टी सांगणे हा त्यावरचा एक खात्रीशीर उपाय आहे. पण आजकाल आईवडिलांनाच अशा गोष्टी माहिती असत नाहीत, त्यादृष्टीनेही ही भक्तांच्या कथांची मालिका सर्वांना उपयोगी पडेल अशी खात्री आहे. त्यामुळे या मालिकेतील गोष्टी वाचून, आपल्या मुलांना रंगवून सांगितल्या तर आपण एक मोठेच काम केल्यासारखे होईल आणि त्याबरोबर आपलीही उजळणी होईल. म्हणून सर्व आईवडिलांनीही या कथा वाचाव्यात तसेच इतरत्र प्रेषित कराव्यात असे वाटते.

Devotee- 3 Bhagwan Brahma-भक्तांच्या कथा-3 -भगवान ब्रह्मा

brahma-2

Please use the google translator at the right top corner of the post to read the post in your language

Devotee- 3 Bhagwan Brahma

ईश्वर प्राप्तीसाठीचे जे मार्ग आहेत- ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग आणि भक्तियोग, यापैकी सर्वात सुलभ आणि सर्वांना सहज उपलब्ध असणारा मार्ग म्हणून भक्तिमार्ग प्रसिद्ध आहे. भक्तिमध्येही नवविधा म्हणजे नऊ प्रकारची भक्ति सांगितलेली आहे- श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम्, अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्.  

यात सगळयात पहिला भक्तीचा प्रकार म्हणजे श्रवण हा सांगितला आहे. त्यात आपल्या आराध्य दैवताच्या कथा ऐकणे याबरोबरच आजवर होऊन गेलेल्या भक्तांच्या कथा ऐकणे यांचाही समावेश आहे. आपल्या भारतवर्षात आजवर असंख्य भक्त होऊन गेले आहेत. निरनिराळ्या प्रदेशात, निरनिराळ्या काळात, निरनिराळ्या भाषिक भागात, होऊन गेलेल्या भक्तांच्या कथा ऐकणे किंवा वाचणे हा सुद्धा एक सत्संगाचा अतिशय परिणामकारक प्रकार आहे. 

गीताप्रेस गोरखपूर यांच्याकडून अशा भक्तांच्या कथा निरनिराळ्या अंकांत किंवा एखाद्या विशेष अंकात प्रसिद्ध होत असतात. आजपासून सुरू होणाऱ्या ‘भक्तांच्या कथा’ या मालिकेत आपण अशाच भक्तांच्या चरित्राची ओळख करून घेणार आहोत. भक्तांच्या चरित्र वाचनाने चित्त शुद्ध होण्यास नक्की मदत होते. ज्यांना अध्यात्मात रस आहे अशा वाचकांना ही मालिका नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.

भगवान ब्रह्मा

Devotee-3 Bhagwan Brahma

याआधी आपण श्री गणेश यांची मातृ पितृ भक्ति पाहिली तसेच भगवान शिवांची विष्णुभक्ति पाहिली. यानंतर त्रिदेवांमधील, सृष्टिनिर्मितीचे कार्य करणारे ब्रह्मदेव यांची भक्ति जाणून घेणार आहोत.

श्रीमद् भागवतात, श्री यमराजाने आपल्या दूतांना प्रमुख भागवताचार्यांचे वर्णन करतांना सांगितले, की

  1. भगवान ब्रह्मा, 2. भगवान शंकर, 3. देवर्षि नारद,
  2. सनकादि कुमार, 5. महर्षि कपिल, 6. महाराज मनु,
  3. भक्तराज प्रह्लाद, 8. महाराज जनक, 9. श्रीभीष्मजी,
  4. दैत्यराज बलि, 11. महामुनी शुकदेव आणि मी स्वतः, म्हणजे 12. यमराज,

असे  बारा आचार्य आहेत जे की रहस्यमय दुर्बोध विशुद्ध भागवत धर्माला जाणतात. त्या बारा आचार्यां मध्ये भगवान ब्रह्मा हे प्रथम आचार्य आहेत.

स्वयंभूर्नारदः शम्भूः कुमारः कपिलो मनुः|
प्रह्लादो जनको भीष्मो बलिर्वैयासकिर्वयम||
द्वादशैते विजानीमो धर्मं भागवतं भटाः|
गुह्यं विशुद्धं दुर्बोधं यं ज्ञात्वामृतमश्नुते|| (श्रीमदभागवत श्लोक 6.3.20-21)

सृष्टीच्या आरंभी शेषशायी भगवान विष्णूंच्या नाभीतून एक ज्योतिर्मय कमल प्रकट झाले आणि त्या कमळाच्या कर्णिकेवर भगवान ब्रह्मा प्रकट झाले.

ब्रह्मदेवाने हे पाहण्यासाठी, की हे कमल कुठून येते आहे, त्या कमळाच्या नाळेमध्ये, म्हणजे पोकळ दांडीमध्ये प्रवेश केला आणि हजार वर्षपर्यन्त शोधत राहिले. पण त्यांना काहीच पत्ता लागला नाही, तेंव्हा ते निराश होऊन कमळाच्या मुखावर परत आले. त्यावेळी त्यांना ‘तप’ हा शब्द दोनवेळा ऐकायला आला. त्यानुसार ब्रह्मदेव दीर्घ कालपर्यंत तप करीत राहिले. तपाद्वारे त्यांचे अंतःकरण पूर्ण निश्चल झाल्यानंतर त्यांना आपल्या अंतःकरणातच शेषशायी भगवान श्री विष्णूचे दर्शन झाले. ब्रह्मदेवाद्वारे  स्तुति केली गेल्यानंतर, भगवंताने त्यांना चार श्लोकांमध्ये भागवताचा उपदेश केला. तेच मूळ चतुः श्लोकी भागवत होय.brahmadev in lotus

अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परम्।
पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहम् ॥१ ॥

श्रीभगवान म्हणतात – सृष्टीपूर्वी फक्त मीच होतो. माझ्या पलीकडे काही नव्हते, खरे-खोटे किंवा त्यापलीकडे. सृष्टी नसतानाही (संहाराच्या वेळी) मी तिथेच राहतो. ही सृष्टीची सर्व रूपे मीच आहे आणि या सृष्टी, परिस्थिती आणि संहारातून जे काही उरले आहे, तेही मीच आहे.

ऋतेऽ र्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि।
तद्विद्यादात्मनो मायां यथाऽऽभासो यथा तमः ॥ २ ॥

माझ्या मूळ तत्वाव्यतिरिक्त जे सत्य दिसते (दिसते) पण आत्म्यात दिसत नाही (दिसत नाही), त्या अज्ञानाला आत्म्याचा भ्रम समजा जो प्रतिबिंब किंवा अंधारासारखा मिथ्या आहे ॥२॥

यथा महान्ति भूतानि भूतेषूच्चावचेष्वनु।
प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् ॥ ३ ॥

ज्याप्रमाणे पाच महान तत्वे (पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश) जगाच्या सर्व लहान-मोठ्या वस्तूंमध्ये अंतर्भूत असूनही त्यांचा अंतर्भाव नाही, त्याचप्रमाणे मी सर्व गोष्टींमध्ये उपस्थित असूनही, मी सर्वांपासून वेगळा आहे ॥3॥

एतावदेव जिज्ञास्यं तत्त्व जिज्ञासुनाऽऽत्मनः।
अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा ॥ ४ ॥

ज्याला आत्म्याचे सार जाणून घ्यायचे आहे, त्याच्यासाठी एवढेच जाणून घेणे योग्य आहे की अन्वय (सृष्टी) किंवा व्यतिरेक (विनाश) या क्रमाने सर्वत्र आणि सदैव (स्थान आणि काळाच्या पलीकडे) राहणारा घटक तोच आत्मा आहे. – सार.

याप्रकारे ब्रह्मदेवाने साक्षात भगवंतांकडून सृष्टीच्या सुरुवातीला तत्त्वज्ञान प्राप्त केले.. नंतर ब्रह्मदेवाने देवर्षि नारदांनी विचारल्यावरून त्यांना या भागवत तत्त्वाचा उपदेश केला आणि भगवतकृपेने हृदयात स्फुरलेल्या भगवंतांच्या लीलांपैकी मुख्य चोवीस अवतारांची चरित्रे सूत्ररूपाने सांगितली.  देवर्षि नारदांनी ते तत्वज्ञान आणि भगवतचरित्र महर्षि व्यासांना ऐकविले आणि व्यासांनी त्याला श्रीमद् भागवताच्या स्वरूपात अठरा सहस्र श्लोकांच्या स्वरूपात शुकदेव यांना ऐकविले. या क्रमाने श्रीमद् भागवताचा सर्व लोकांत विस्तार झाला.

जेंव्हा जेंव्हा पृथ्वी असुरांच्या अधर्माचरणाने पीडित होते, तेंव्हा तेंव्हा ती देवतांसह भगवान विष्णूंकडे जाऊन आपले गाऱ्हाणे मांडते. त्यावेळी ब्रह्मदेव त्या परम परमेश्वराची प्रार्थना करून जसा त्यांचा आदेश होईल त्याप्रमाणे देवतांना आदेश देतात. अशा प्रकारे भगवंताचे बहुतेक अवतार हे ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेमुळे होतात आणि त्या त्या अवतारांच्या वेळी ब्रह्मदेव भगवंताच्या लीलांचे दर्शन करण्यासाठी उपस्थित होतात.

जेंव्हा भगवान वामन अवताराने दैत्यराज बळीच्या यज्ञात तीन पावले भूमीच्या दानाचा संकल्प करून घेतला, आणि संबंध पृथ्वी एका पायाने व्यापून आपल्या विराट स्वरूपाला प्रकट करीत दुसरा पाय स्वर्गाकडे नेला, तेंव्हा भगवंताचा तो चरण ब्रह्मलोकापर्यन्त पोंचला. त्यावेळी ब्रह्मदेवाने मोठ्या श्रद्धेने तो चरण धुतला, आणि त्याची पूजा केली. भगवान वामनाच्या त्या चरणाच्या अंगठ्याच्या नखामुळे ब्रह्मांडाचे बाह्य आवरण थोडेसे फाटले आणि त्या छिद्रातून ब्रह्मांडातून बाहेर ब्रह्मवारि भगवंताच्या श्रीचरणावर आले. ब्रह्माने भगवंताचे ते चरणोदक, म्हणजेच ‘ब्रह्मद्रव’ आपल्या कमंडलूमध्ये भरले, आणि सदैव ते चरणोदक आपल्या जवळ ठेवू लागले. महाराज भगीरथ यांनी तप केल्यावर त्याच कमंडलूमधील थोडेसे द्रव ब्रह्माने सोडले, ते तीन रूपांमध्ये झाले. ती तीन रूपें म्हणजे, स्वर्गातील मंदाकिनी, पाताळातील भोगावती, आणि पृथ्वीवर गंगा यांच्या रूपाने भगवंताचे तेच चरणोदक साक्षात ब्रह्मद्रव प्रवाहित होत आहे. म्हणूनच गंगा ही विष्णू चरणांपासून निघाली आहे अशी आपली श्रद्धा आहे. vaman and bali

ब्रह्माजी ने स्वतः आपल्या स्थितीचे वर्णन करीत म्हटले आहे, की माझी वाणी कधी असत्याकडे प्रवृत्त होत नाही, माझे मन कधी असत्याकडे जात नाही, माझी इंद्रियें कधी असन्मार्गाकडे झुकत नाहीत, कारण मी हृदयामध्ये अत्यंत उत्कंठेने श्रीहरि चे नाम धारण करतो.

अशा प्रकारे भागवत धर्माच्या प्रथम आचार्य ब्रह्माजी ने सर्वांना हा उपदेश केला आहे की वाणीने कधी असत्य भाषण होऊ नये, मन कुमार्गाला जाऊ नये, इंद्रियें विषयाकडे प्रवृत्त होऊ नयेत, यासाठी एकमात्र उपाय म्हणजे भगवंताचे नाम हृदयात धारण करणे हा आहे.

अशा प्रकारे, भक्तांच्या मालिकेत आपण श्री गणेश, भगवान शिव यांच्यानंतर ब्रह्मदेवांचे स्मरण केले. यानंतरच्या लेखात आपण परम भक्त श्री यमराज यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. त्यानंतर, सनकादि कुमार, देवर्षि नारद, ब्रह्मर्षि वशिष्ठ, महर्षि अत्रि, महर्षि भृगु यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

श्रीहरि!

संकलक- माधव भोपे

आजकाल लहान मुलांना मोबाईल आणि टीव्हीच्या अतिरेकी वापरापासून आणि त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामां पासून कसे वाचवावे हा सगळ्याच पालकांसमोर असणारा यक्षप्रश्न आहे. संस्कारक्षम अशा वयात अशा मुलांना रंजक आणि त्याचबरोबर शुभसंस्कार करणाऱ्या गोष्टी सांगणे हा त्यावरचा एक खात्रीशीर उपाय आहे. पण आजकाल आईवडिलांनाच अशा गोष्टी माहिती असत नाहीत, त्यादृष्टीनेही ही भक्तांच्या कथांची मालिका सर्वांना उपयोगी पडेल अशी खात्री आहे. त्यामुळे या मालिकेतील गोष्टी वाचून, आपल्या मुलांना रंगवून सांगितल्या तर आपण एक मोठेच काम केल्यासारखे होईल आणि त्याबरोबर आपलीही उजळणी होईल. म्हणून सर्व आईवडिलांनीही या कथा वाचाव्यात तसेच इतरत्र प्रेषित कराव्यात असे वाटते.

Devotee-2 Shri Mahadev-भक्तांच्या कथा-2 -भगवान शिव

bhagan shiv

Please use the google translator at the right top corner of the post to read the post in your language

Devotee-2 Shri Mahadev

ईश्वर प्राप्तीसाठीचे जे मार्ग आहेत- ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग आणि भक्तियोग, यापैकी सर्वात सुलभ आणि सर्वांना सहज उपलब्ध असणारा मार्ग म्हणून भक्तिमार्ग प्रसिद्ध आहे. भक्तिमध्येही नवविधा म्हणजे नऊ प्रकारची भक्ति सांगितलेली आहे- श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम्, अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्.  

यात सगळयात पहिला भक्तीचा प्रकार म्हणजे श्रवण हा सांगितला आहे. त्यात आपल्या आराध्य दैवताच्या कथा ऐकणे याबरोबरच आजवर होऊन गेलेल्या भक्तांच्या कथा ऐकणे यांचाही समावेश आहे. आपल्या भारतवर्षात आजवर असंख्य भक्त होऊन गेले आहेत. निरनिराळ्या प्रदेशात, निरनिराळ्या काळात, निरनिराळ्या भाषिक भागात, होऊन गेलेल्या भक्तांच्या कथा ऐकणे किंवा वाचणे हा सुद्धा एक सत्संगाचा अतिशय परिणामकारक प्रकार आहे. 

गीताप्रेस गोरखपूर यांच्याकडून अशा भक्तांच्या कथा निरनिराळ्या अंकांत किंवा एखाद्या विशेष अंकात प्रसिद्ध होत असतात. आजपासून सुरू होणाऱ्या ‘भक्तांच्या कथा’ या मालिकेत आपण अशाच भक्तांच्या चरित्राची ओळख करून घेणार आहोत. भक्तांच्या चरित्र वाचनाने चित्त शुद्ध होण्यास नक्की मदत होते. ज्यांना अध्यात्मात रस आहे अशा वाचकांना ही मालिका नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.

आजकाल लहान मुलांना मोबाईल आणि टीव्हीच्या अतिरेकी वापरापासून आणि त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामां पासून कसे वाचवावे हा सगळ्याच पालकांसमोर असणारा यक्षप्रश्न आहे. संस्कारक्षम अशा वयात अशा मुलांना रंजक आणि त्याचबरोबर शुभसंस्कार करणाऱ्या गोष्टी सांगणे हा त्यावरचा एक खात्रीशीर उपाय आहे. पण आजकाल आईवडिलांनाच अशा गोष्टी माहिती असत नाहीत, त्यादृष्टीनेही ही भक्तांच्या कथांची मालिका सर्वांना उपयोगी पडेल अशी खात्री आहे. त्यामुळे या मालिकेतील गोष्टी वाचून, आपल्या मुलांना रंगवून सांगितल्या तर आपण एक मोठेच काम केल्यासारखे होईल आणि त्याबरोबर आपलीही उजळणी होईल. म्हणून सर्व आईवडिलांनीही या कथा वाचाव्यात तसेच इतरत्र प्रेषित कराव्यात असे वाटते.

भगवान शिव

Devotee-2 Shri Mahadev

याआधी आपण श्री गणेश यांची मातृ पितृ भक्ति पाहिली. भक्तांच्या मालिकेत आपण भगवान शिव यांची कथा जाणून घेऊयात. पुन्हा तोच प्रश्न आपल्या मनात उपस्थित होऊ शकतो, की भगवान शिव हे तर साक्षात देवाधिदेव- महादेव आहेत. मग त्यांचे नांव भक्तांच्या यादीत कसे? जगद्गुरु आद्य श्रीशंकराचार्य यांनी देव पंचायतनची जी कल्पना रुजवली, त्यातील पाच देव म्हणजे- श्री विष्णू, भगवान शंकर, श्रीदेवी आदिशक्ति, श्री गणेश आणि सूर्य भगवान. मग या पंचयातनपैकी असलेले भगवान शंकर हे कोणाचे भक्त?

भगवान शंकर आणि भगवान नारायण हे सदा अभिन्न आहेत. परंतु भक्तांच्या आवडीप्रमाणे एकच सच्चिदानानंदघन परमात्मा दोन स्वरूपांमध्ये स्थित आहे. आणि दोघेही एकमेकांची भक्ति करतात, असे वर्णन ठिकठिकाणी आले आहे.

भगवान नारायण (विष्णू), आणि त्यांचे अवतार- श्री रामचंद्र आणि श्रीकृष्ण हे परम शैव आहेत.   भगवान विष्णूंनी श्री शंकराच्या पूजेमध्ये सहस्र कमलदल अर्पण करण्याचा संकल्प केला, आणि जेंव्हा त्यात एक कमल कमी पडू लागले, त्यावेळी आपले कमलरूप नेत्र काढून त्या ठिकाणी अर्पण केले. तोच श्री विष्णूंचा शिवाप्रति असलेला भक्तिभाव किंवा भक्तीचा उद्रेक हा सुदर्शन चक्र बनून श्री विष्णूंना  प्राप्त झाला जो की श्री विष्णू विश्वाच्या कल्याणार्थ आणि भक्तांच्या संरक्षणार्थ नेहमी वापरतात. याचे फार बहारदार वर्णन श्री पुष्पदंत गंधर्वाने रचलेल्या शिव महिम्न स्तोत्रात आलेले आहे.vishnu lotus to shiva

हरिस्ते साहस्रं कमल बलिमाधाय पदयोः।
यदेकोने तस्मिन् निजमुदहरन्नेत्रकमलम्।।
गतो भक्त्युद्रेकः परिणतिमसौ चक्रवपुषः।
त्रयाणां रक्षायै त्रिपुरहर जागर्ति जगताम्।।
शिव महिम्न स्तोत्र १९।।

तर श्रीरामाने, रावणाशी युद्ध करण्याच्या आधी, दक्षिणेमध्ये श्री    रामेश्वर लिंगाची स्थापना केली. श्री कृष्णाने शंकराची आराधना करून कार्तिक स्वामीला, महाराणी जंबूवती चा मुलगा सांबच्या रूपात प्राप्त केले.rameshwaram-1

त्याचप्रमाणे भगवान शिव हे परम वैष्णव आहेत. ते निरंतर राम नामाचा जप करतात. आणि त्यांच्या मुक्तिधाम काशीपुरी मध्ये देहत्याग करणाऱ्या प्रत्येक प्राणिमात्राच्या कानात ‘राम’ या तारक मंत्राचा उपदेश करून त्याला मुक्ति प्रदान करतात.

पुराणात अशी एक कथा येते की श्री विष्णूंचे शत कोटी मंत्र आहेत, किंवा श्री राम चरित्र हे शत कोटी श्लोकांचे आहे- एकदा देव दानव आणि राक्षस यांच्यामध्ये हे वाटून घेण्याविषयी वाद झाला, आणि ते सगळे भगवान शिवांकडे गेले. तेंव्हा शिवाने, त्या शंभर कोटी श्लोकांचे सारखे वाटे करून तिघांना दिले.  प्रत्येकाच्या वाट्याला 33 कोटी, 33 लाख, 33 हजार, 333 श्लोक आले. एक श्लोक उरला. हा एक श्लोक अनुष्टुप छन्दात होता, ज्याच्यात 32 अक्षरें असतात. भगवान शिवाने तिघांना 10-10 अक्षरें वाटून दिली. उरली दोन अक्षरें- ती दोन अक्षरें होती- ‘रा’ आणि ‘म’. शिवांनी सांगितले- ही दोन अक्षरें मात्र मी कोणालाही देणार नाही- त्यांना मी माझ्या कंठात ठेवीन- कारण ते माझे आराध्य दैवत आहे.

एकदा देव आणि असुर मिळून समुद्र मंथन करीत होते. त्यावेळी सगळयात पहिल्यांदा समुद्रातून अतिशय जहाल असे हलाहल विष वर आले. ते विष सर्व लोकांमध्ये पसरू लागले. तेंव्हा देव आणि दानव भगवान शंकरांना शरण गेले आणि विश्वाचे रक्षण करण्याविषयी प्रार्थना केली. त्यावेळी भगवान शंकरांनी श्री रामाचे नांव घेऊन ते हलाहल विष हातावर घेऊन, प्राशन केले. परंतु ते तोंडात असतांना त्यांना लक्षात आले की हे विष जर पोटात गेले, तर आपल्या पोटात असणाऱ्या विश्वाला, सर्व सृष्टीला हे मारक ठरेल. तेंवह त्यांनी ते विष आपल्या कंठात धारण केले. तेंव्हापासून त्यांचे नीलकंठ हे नांव प्रसिद्ध झाले.halahal vish

श्री विष्णूसहस्र नामाच्या शेवटी जी फलश्रुति आहे, त्यात आले आहे की, पार्वतीने शंकरांना विचारले, की या सहस्र नामांना जर थोडक्यात घ्यायचे असेल तर काय करायला पाहिजे?

पार्वत्युवाच —
केनोपायेन लघुना विष्णोर्नामसहस्रकम् ।
पठ्यते पण्डितैर्नित्यं श्रोतुमिच्छाम्यहं प्रभो ॥ २६॥

त्यावर शंकरांनी पार्वतीला सांगितले-

ईश्वरउवाच—
श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने ॥ २७॥
श्रीरामनाम वरानन ॐ नम इति ।

हे पार्वती, श्रीराम हे एक नाम हे सहस्र नामांच्या बरोबर आहे. त्यामुळे एक राम नाम घेतले तर ते विष्णूंच्या सहस्र नामांच्या बरोबर आहे.

भगवान श्रीकृष्ण जेंव्हा गोकुळात अवतार घेते झाले, त्यावेळी त्यांचे मोहक बालरूप पाहण्यासाठी सर्व देव लालायित झाले. भगवान शिव हे तर त्यांचे परम भक्त होते. श्रीकृष्णाचे बालरूप पाहण्यासाठी ते जोग्याच्या वेशात गोकुळामध्ये दाखल झाले, आणि यशोदेच्या दारावर जाऊन भिक्षा मागू लागले. यशोदा जेंव्हा त्यांना भिक्षा द्यायला दारावर आली, तेंव्हा त्यांनी धन किंवा धान्यरूपी भिक्षा नको असून, तुझ्या पोटी आलेल्या दिव्य बालकाचे दर्शन हीच भिक्षा दे असे यशोदेला विनवून, त्यांनी श्रीकृष्णाच्या बालरुपाचे दर्शन घेतले होते अशी कथा आहे.bhagvan shiv visits gokul

अशा प्रकारे, भगवान शिव हे भगवान विष्णू आणि त्यांचे अवतार- श्री राम आणि श्रीकृष्ण यांचे परम भक्त आहेत.

भक्तांच्या मालिकेत श्री गणेशापासून सुरुवात करून, आज आपण भगवान शंकरांची भक्ति पाहिली. यानंतर आपण ‘ब्रह्मदेव’ यांची कथा पाहणार आहोत.

त्यानंतरच्या लेखांत आपण अनुक्रमे खालील भक्तांची चरित्रे पाहणार आहोत.

  • देवर्षि नारद
  • महर्षि व्यासदेव
  • शुकदेव
  • भक्त ध्रुव
  • भीष्म
  • भक्त प्रल्हाद
  • हनुमान
  • शंकराचार्य
  • संत ज्ञानेश्वर
  • संत एकनाथ
  • संत सूरदास
  • गोस्वामी तुलसीदासजी
  • महान भक्त मीराबाई
  • संत नामदेव
  • संत तुकाराम
  • दक्षिणेतील अनेक संत

संतांची, भक्तांची ही यादी खूप मोठी आहे. संतांची आणि भक्तांची चरित्रें वाचून अनयासेच सत्संग होतो.

तेंव्हा, या मालिकेत यातील जास्तीत जास्त भक्तांची चरित्रे देण्याचा प्रयत्न राहील.

श्रीहरि!

संकलन-माधव भोपे 

भक्तांच्या कथा-1-श्री गणेश-Devotee-1 Shri Ganesh

ganesh-2-1024x892

Please use the google translator at the right top corner of the post to read the post in your language

ईश्वर प्राप्तीसाठीचे जे मार्ग आहेत- ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग आणि भक्तियोग, यापैकी सर्वात सुलभ आणि सर्वांना सहज उपलब्ध असणारा मार्ग म्हणून भक्तिमार्ग प्रसिद्ध आहे. भक्तिमध्येही नवविधा म्हणजे नऊ प्रकारची भक्ति सांगितलेली आहे- श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम्, अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्.  

यात सगळयात पहिला भक्तीचा प्रकार म्हणजे श्रवण हा सांगितला आहे. त्यात आपल्या आराध्य दैवताच्या कथा ऐकणे याबरोबरच आजवर होऊन गेलेल्या भक्तांच्या कथा ऐकणे यांचाही समावेश आहे. आपल्या भारतवर्षात आजवर असंख्य भक्त होऊन गेले आहेत. निरनिराळ्या प्रदेशात, निरनिराळ्या काळात, निरनिराळ्या भाषिक भागात, होऊन गेलेल्या भक्तांच्या कथा ऐकणे किंवा वाचणे हा सुद्धा एक सत्संगाचा अतिशय परिणामकारक प्रकार आहे. 

गीताप्रेस गोरखपूर यांच्याकडून अशा भक्तांच्या कथा निरनिराळ्या अंकांत किंवा एखाद्या विशेष अंकात प्रसिद्ध होत असतात. आजपासून सुरू होणाऱ्या ‘भक्तांच्या कथा’ या मालिकेत आपण अशाच भक्तांच्या चरित्राची ओळख करून घेणार आहोत. भक्तांच्या चरित्र वाचनाने चित्त शुद्ध होण्यास नक्की मदत होते. ज्यांना अध्यात्मात रस आहे अशा वाचकांना ही मालिका नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.

आजकाल लहान मुलांना मोबाईल आणि टीव्हीच्या अतिरेकी वापरापासून आणि त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामां पासून कसे वाचवावे हा सगळ्याच पालकांसमोर असणारा यक्षप्रश्न आहे. संस्कारक्षम अशा वयात अशा मुलांना रंजक आणि त्याचबरोबर शुभसंस्कार करणाऱ्या गोष्टी सांगणे हा त्यावरचा एक खात्रीशीर उपाय आहे. पण आजकाल आईवडिलांनाच अशा गोष्टी माहिती असत नाहीत, त्यादृष्टीनेही ही भक्तांच्या कथांची मालिका सर्वांना उपयोगी पडेल अशी खात्री आहे. त्यामुळे या मालिकेतील गोष्टी वाचून, आपल्या मुलांना रंगवून सांगितल्या तर आपण एक मोठेच काम केल्यासारखे होईल आणि त्याबरोबर आपलीही उजळणी होईल. म्हणून सर्व आईवडिलांनीही या कथा वाचाव्यात तसेच इतरत्र प्रेषित कराव्यात असे वाटते.

प्रथम भक्त- श्री गणेश

ganesh prithvi parikrama

Devotee-1 Shri Ganesh

श्री गणेश हे तर स्वतः च आद्य देव आहेत, मग त्यांचे नांव भक्तांमध्ये कसे? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. भगवंताची रूपें अनंत आहेत. पण या रूपांपैकी ५  रूपें ही मुख्यतः पूजली जातात- 

१. भगवान नारायण- किंवा विष्णू, २. भगवान शिव, ३. भगवति महाशक्ति, ४. भगवान सूर्य, आणि ५. भगवान गणपति.  

गणपति आद्य पूज्य असल्याच्या अनेक कथा वाचायला मिळतात, गणपति हे रुद्रगणांचे अधिपति आहेत, त्यामुळे त्यांची पूजा सर्वप्रथम केल्याने कार्य निर्विघ्न पार पडते, अशी श्रद्धा आहे. गणेशाला प्रथम पूजनाचा मान कशामुळे प्राप्त झाला, याबद्दलची कथा सर्वश्रुत आहे- जेंव्हा सृष्टीच्या आरंभी, देवतांमध्ये कोणाला प्रथम पूजनीय मानले जावे हा प्रश्न उपस्थित झाला, तेंव्हा सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने त्यांना सांगितले, की जो कोणी पृथ्वीची प्रदक्षिणा सर्व प्रथम पूर्ण करून येईल, त्याला प्रथम पूजेचा मान मिळेल. 

त्यानंतर सर्व देव आपआपल्या वाहनांवर बसून पृथ्वी प्रदक्षिणेला निघाले. त्यावेळी, गणेशाने, आपल्या आई वडिलांची, अर्थात, भगवान शंकर आणि पार्वती यांची प्रदक्षिणा केली, कारण की, ‘माता साक्षात् क्षितेस्तनुः’ अर्थात, माता साक्षात पृथ्वीरूप आहे, आणि पिता हे प्रजापतिरूप आहेत.  त्यामुळे श्रीगणेशाची पृथ्वी प्रदक्षिणा अशा रीतीने सर्वांच्या आधी पूर्ण झाली आणि तेंव्हापासून श्री गणेशाला आद्य पूजेचा मान मिळाला.  हीच कथा, श्री गणेश आणि कार्तिकेय यांच्या संदर्भात सुद्धा वेगळ्या प्रकारे येते. 

पण या कथेचा आशय इतकाच, की अशा प्रकारे आपल्या माता पित्यांची श्रेष्ठता आणि माता पित्याच्या  भक्तिचा आदर्श श्री गणेशाने स्थापित केला आणि दाखवून दिले, की केवळ शरीराच्या बळावर किंवा इतर लौकिक साधनांवर विश्वास ठेवून सिद्धी मिळू शकत नाही, त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कधीही धोका खाऊ शकतो.  अशा प्रकारे आपल्या माता पित्याच्या भक्तीचा आदर्श घालून देणाऱ्या श्री गणेशाला आरंभी वंदन!

Renuka Ashtak-7 अवो रेणुके रेणुके रेणुके तू – रेणुका अष्टक-7

mahur gad-2

( वृत्त – भुजंगप्रयात )
दयाळे ! तुझ्या कोटि ब्रह्मांड पोटीं
स्वयें पाळिशी जीव कोट्यानकोटी
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥१॥

कधीं आपुलें दाविसी मूळपीठ
मिळो ना मिळो खावया गूळ – पीठ
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥२॥

तुझ्यापाशिं राहीन खाईन भाजी
जगामाजि सांगेन ही माय माझी
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥३॥

बरा नाहिं का मी धुया लुगडें हो
अशा पूरवावी दयाळू गडे, हो
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥४॥

तुझी भक्ति अंगामधें संचरावी
तुझी माउली वेणि म्यां विंचरावी
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥५॥

तुला प्रार्थना हीच जोडूनि पाणी
तुझ्या द्वारिं राहीन, वाहीन पाणी
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥६॥

नसे द्यावया वस्त्र यद्वा दशीला
तुझ्या पंक्तिला येउं दे द्वादशीला
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥७॥

जिवाहूनि आतां करुं काय दान
आईनें रुसावें असा कायदा न
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥८॥

सदा विष्णुदासाचिया हे अगाई
दया येउं दे जाहलों गाइ – गाई
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥९॥

विष्णूदासाची कविता 

Renuka Ashtak-6 तुझे सुंदर रूप रेणुके विराजे – रेणुका अष्टक-6

renuka-7

 वृत्त : दिंडी )
तुझें सुंदर रुप रेणुके विराजे
वर्णिताती मुनि देव देवि राजे
कोण स्वगुणाचा करिल गुणाकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१॥

सदानंद मुख चंद्रमा सबंध
रत्नहार, मणी, वांकि बाजुबंद
मुक्तजडित सुवर्ण अलंकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥२॥

विलोकुन नथ नासिकीं, काप कानीं
मार्ग विसरावा मोक्ष साधकांनीं
हांक द्यावी लक्षुनी लक्षवार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥३॥

साडि पिवळी खडिदार भरजरीची
तंग चोळी अंगांत अंजिरीची
टिळा कुंकुम, निट वेणि पिळेदार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥४॥

सप्तशतिचे पुढें पाठ घणघणाट
टाळ, घंटा, कंकणें, खणखणाट
पायिं पैंजण घन देति झणत्कार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥५॥

मूळ धाडी दर्शना यावयासी
लावि भजनीं या उर्वरित वयासी
तोडि सारा हा दृष्ट अहंकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥६॥

पर्वतीं या बसलीस अम्हांसाठीं
परी अमुची खरचली जमा साठी
भरत आला स्थळ – भरतिचा अकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥७॥

माय वंची दुरदेशिं मुलांनाही
अशी वार्ता ठाऊक मला नाहीं
अगे आई ! हा काय चमत्कार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥८॥

ब्रीद सोडुन बसलीस बेफिकीर
मला केलें सरदार ना फकीर
काय म्हणतिल व्यासादि ग्रंथकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥९॥

तरी आतां ये, धांव, पाव, तार
त्वरित आतां तरि धांव, पाव, तार
करी माझा अविलंबें अंगिकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१०॥

काय रागें झालीस पाठमोरी
तेरि अम्मा फिर एकि वाट मोरी
केशराचा हरपेल कीं शकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥११॥

पहा जातो नरजन्म – रंग वायां
नये सहसा परतून रंगवाया
म्हणुनि करितों विशेष हाहाःकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१२॥

कृपासूत्रें वोढोनि पाय दावी
जशी बांधी कृष्णासि माय दावीं
अहो मीही अन्यायि अनीवार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१३॥

मीच अथवा तुज ह्रदय – मंदिरांत
प्रेमसूत्रें बांधीन दिवस – रात
यथातथ्य परि नसे अधीकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१४॥

कसा एका पुष्पाचिया आवडीनें
मुक्त केला गजराज तांतडीनें
तसा मीही अर्पितों सुमनहार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१५॥

केली दुल्लड ही पदर पंधराची
तुझ्यासाठींची, आण शंकराची
विष्णुदास म्हणे रेणुके स्विकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१६॥

विष्णूदासाची कविता